माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 7 March 2019

शब्द स्नेही

  महिला नारी कामिनी
  अर्धांगी बायको पत्नी


  भ्रतार नवरा पती
  प्रेम लोभ प्रीती

   माय माऊली माता
   जनक बाप पिता

  कन्या तनया नंदिनी
   बहिण ताई भगिनी

  लक्ष्मी कमला इंदिरा
  भूमी क्षमा वसुंधरा

   कल्याण कुशल हित
   अखंड अविरत सतत

   गृह निवास सदन
   संकेत निशाणी खूण

   रम्य सुरेख सुंदर
   निपुण कुशाल हुशार

   राऊळ देऊळ मंदिर
   आस्था जिव्हाळा आदर

   हिंमत शौर्य धाडस
   मर्यादा सीमा वेस

   व्यथा यातना वेदना
  चिंता काळजी विवेचना

  अवघड कठीण बिकट
  पथ मार्ग वाट

 स्मृती स्मरण आठवण
  संपत्ती दौलत धन

 पुत्र सुत नंदन
 झेंडा पताका निशाण

 वंदन नमन अभिवादन
 गौरव सन्मान अभिनंदन 

================================

लेखक /कवी :-- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                    पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
                     ९४२२७३६७७५

Tuesday, 5 March 2019

तीन - तीन नावे सांगा.(सामान्यज्ञान)


(१) कीटक
--- झुरळ, मुंगी, फुलपाखरू.
(२) वनस्पतीचे अवयव
---  पान, फूल, फळ.
(३) धातू
---  तांबे, लोखंड,  चांदी.
(४) चर्मवाद्य
---  तबला, ढोलक, मृदंग.
(५) मांसाहारी प्राणी
---  लांडगा, तरस,  वाघ.
(६) कंदमुळे
---  रताळी, गाजर, मुळे.
(७) पाण्याचे स्रोत
---  झरा, नदी,  तलाव.
(८) मैदानी खेळ
---  क्रिकेट,  फुटबॉल, हाॅकी.
(९) नैसर्गिक आपत्ती
---  भूकंप, त्सुनामी, पूर.
(१०) त॔तुवाद्य
---  सारंगी, सरोद, वीणा.
(११) रोगाची नावे
---   हिवताप,  काॅलरा,  कावीळ.
(१२) कारागिर
---    लोहार,  सुतार, गवंडी.
(१३) अवजारे
---   हातोडा,  करवत, कुदळ.
(१४) गोड अन्नपदार्थ
---   खीर,  शिरा,  बासुंदी.
(१५) प्रसारमाध्यमे
---   वृत्तपत्र,  मासिक,  दूरचित्रवाणी.
(१६) सरपटणारे प्राणी
---   साप,  सरडा,  गोगलगाय.
(१७) जलचर प्राणी
---  मासा,  खेकडा,  कासव.
(१८) सागर संपत्ती
---    मासे,  शिंपले,  मीठ.
(१९) माशांच्या जाती
---   बांगडा,  पापलेट,  सुरमई.
(२०) शेतीची कामे
---   नांगरणी, पेरणी,  कापणी.
(२१) धागे मिळणाऱ्या वनस्पती
---   अंबाडी, ताग, घातपात.
(२२) प्रदूषणाचे प्रकार
---   जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण.
(२३) तंबाखूयुक्त पदार्थ
---   तंबाखू,  गुटखा,  सिगारेट.
(२४) झाडांवर राहणारे प्राणी
---   माकड,  खार, पोपट.
(२५) कपडे
---   धोतर,  साडी,  सदरा.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775
       
 

Sunday, 3 March 2019

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) संभ्रमात पडणे.
---  गोंधळात पडणे.

(२) हमरीतुमरीवर येणे.
---  जोराने भांडण लागणे.

(३) हरभ-याच्या झाडावर चढणे.
---  खोटी स्तुती करून मोठेपणा देणे.

(४) हस्तगत करणे.
---  ताब्यात घेणे.

(५) हातपाय गळणे.
---  धीर सुटणे.

(६) हातापाया पडणे.
---  गयावया करणे.

(७) प्रश्नांची सरबत्ती करणे.
---  एकसारखे प्रश्न विचारणे.

(८) बुचकळ्यात पडणे.
---  गोंधळून जाणे.

(९) रक्ताचे पाणी करणे.
---  अतिशय मेहनत करणे.

(१०) लौकिक मिळवणे.
---   सर्वत्र मान मिळवणे.

(११) वकीलपत्र घेणे.
---   एखाद्याची बाजू घेणे.

(१२) वणवण भटकणे.
---एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे.

(१३) दगा देणे.
---   फसवणे.

(१४) धाबे दणाणणे.
---   खूप घाबरणे.

(१५) नाक मुरडणे.
---   नापसंती दाखवणे.

(१६) जमीनदोस्त करणे.
---   पूर्णपणे नष्ट करणे.

(१७) डोळ्यात धूळ फेकणे.
---   फसवणूक करणे.

(१८) तारांबळ उडणे.
---   अतिशय घाई करणे.

(१९) तोंडाला पाने पुसणे.
---    फसवणे.

(२०) घाम गाळणे.
---   खूप कष्ट करणे.

(२१) ओक्साबोक्शी रडणे.
---    मोठ्याने आवाज करत रडणे.

(२२) किरकिर करणे.
-- एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.

(२३) कुणकुण लागणे.
---   चाहूल लागणे.  
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775