माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 3 March 2019

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) संभ्रमात पडणे.
---  गोंधळात पडणे.

(२) हमरीतुमरीवर येणे.
---  जोराने भांडण लागणे.

(३) हरभ-याच्या झाडावर चढणे.
---  खोटी स्तुती करून मोठेपणा देणे.

(४) हस्तगत करणे.
---  ताब्यात घेणे.

(५) हातपाय गळणे.
---  धीर सुटणे.

(६) हातापाया पडणे.
---  गयावया करणे.

(७) प्रश्नांची सरबत्ती करणे.
---  एकसारखे प्रश्न विचारणे.

(८) बुचकळ्यात पडणे.
---  गोंधळून जाणे.

(९) रक्ताचे पाणी करणे.
---  अतिशय मेहनत करणे.

(१०) लौकिक मिळवणे.
---   सर्वत्र मान मिळवणे.

(११) वकीलपत्र घेणे.
---   एखाद्याची बाजू घेणे.

(१२) वणवण भटकणे.
---एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे.

(१३) दगा देणे.
---   फसवणे.

(१४) धाबे दणाणणे.
---   खूप घाबरणे.

(१५) नाक मुरडणे.
---   नापसंती दाखवणे.

(१६) जमीनदोस्त करणे.
---   पूर्णपणे नष्ट करणे.

(१७) डोळ्यात धूळ फेकणे.
---   फसवणूक करणे.

(१८) तारांबळ उडणे.
---   अतिशय घाई करणे.

(१९) तोंडाला पाने पुसणे.
---    फसवणे.

(२०) घाम गाळणे.
---   खूप कष्ट करणे.

(२१) ओक्साबोक्शी रडणे.
---    मोठ्याने आवाज करत रडणे.

(२२) किरकिर करणे.
-- एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.

(२३) कुणकुण लागणे.
---   चाहूल लागणे.  
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775

       

 

No comments:

Post a Comment