माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 2 January 2022

सावित्री तुझ्यामुळेच ........


सावित्री तुझ्यामुळेच मी शाळेत जाते.
सावित्री तुझ्यामुळेच मी वाचन करते
सावित्री तुझ्यामुळेच मी लेखन करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी भाषण करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी नेतृत्व करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी नाविन्याचा शोध घेते.
सावित्री तुझ्यामुळेच मी जागरूक झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी ज्ञानी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी स्वावलंबी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी जबाबदार झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कष्टाळू झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कार्यतत्पर झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी धीट झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी सुसंस्कृत झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी सुखी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कौतुकास पात्र झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी अभिमानी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी प्रेरणादायी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी राष्ट्रपती झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मला दूरदृष्टी मिळाली.
सावित्री तुझ्यामुळेच माझी प्रगती झाली.
सावित्री तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला गती आली

लेखन:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
           जि. प.प्रा.शाळा बांडीकुहेर
           केंद्र- रोहोड ता.साक्री जि.धुळे
           ९४२२७३६७७५


भारताचे राष्ट्रीय सन्मानचिन्ह --- राष्ट्रध्वज



राष्ट्रध्वज 

●आपल्या देशाचा राष्ट्रध्वज अशोक चक्रांकित तिरंगा आहे. 

● राष्ट्रध्वज हे भारताचे पहिले राष्ट्रीय सन्मानचिन्ह आहे.

● केशरी (वरच्या बाजूला) पांढरा (मध्ये) आणि हिरवा (खालच्या बाजूला) असे तीन रंगाचे समान पट्टे असतात.

●राष्ट्रध्वजाची लांबी-रुंदी ३:२ प्रमाणात असते. 

● अशोक चक्र निळ्या रंगाचे असून त्याला २४ आरे असतात.

 ● केशरी रंग :-- त्याग, बलिदान, तपस्या, धैर्य यांचे प्रतीक.

 ● पांढरा रंग :-- सत्य, शांतता, पावित्र्य यांचे प्रतीक.

● हिरवा रंग :-- समृद्धतेचे प्रतीक.

● अशोक चक्र :-- निळ्या रंगाचे धर्मचक्र. सत्य धर्माचे आचरण करणारा संदेश.

● २४ आरे :-- चोवीस तास सतत धर्मानुसार गतिमान.

● राष्ट्रध्वज रचना समिती :-- पंडित नेहरू, सरदार पटेल इत्यादी सात सदस्य.

● घटना समितीने राष्ट्रध्वजास २२ जुलै १९४७ रोजी संमती दिली.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


.

Saturday, 1 January 2022

एका शब्दात उत्तरे सांगा.



१)सूर्योदयाची दिशा कोणती ?
-----  ‌‌पूर्व

(२) सूर्यास्ताची दिशा कोणती ?
----- पश्चिम

(३) उत्तर दिशेसमोरील दिशा कोणती ?
----- दक्षिण

(४) दक्षिण दिशेसमोरील दिशा कोणती ?
----- उत्तर

(५) भारताच्या दक्षिण दिशेस असणारा महासागर कोणता ?
----- हिंदी

(६) भारताच्या पश्चिमेस असणारा समुद्र कोणता ?
----- अरबी

(७) भारताच्या पूर्वेस असणारा उपसागर कोणता ?
------ बंगाल

(८) मुख्य दिशा किती ?
----- चार

(९) साठ सेकंदाच्या कालावधीस काय म्हणतात ?
------ मिनिट

(१०) साठ मिनिटांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- तास

(११) चोवीस तासांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- दिवस

(१२) सात दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- आठवडा

(१३) पंधरा दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
---- पंधरवडा

(१४) तीस दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
------ महिना

(१५) बारा महिन्यांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- वर्ष
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५