माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 1 January 2022

एका शब्दात उत्तरे सांगा.



१)सूर्योदयाची दिशा कोणती ?
-----  ‌‌पूर्व

(२) सूर्यास्ताची दिशा कोणती ?
----- पश्चिम

(३) उत्तर दिशेसमोरील दिशा कोणती ?
----- दक्षिण

(४) दक्षिण दिशेसमोरील दिशा कोणती ?
----- उत्तर

(५) भारताच्या दक्षिण दिशेस असणारा महासागर कोणता ?
----- हिंदी

(६) भारताच्या पश्चिमेस असणारा समुद्र कोणता ?
----- अरबी

(७) भारताच्या पूर्वेस असणारा उपसागर कोणता ?
------ बंगाल

(८) मुख्य दिशा किती ?
----- चार

(९) साठ सेकंदाच्या कालावधीस काय म्हणतात ?
------ मिनिट

(१०) साठ मिनिटांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- तास

(११) चोवीस तासांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- दिवस

(१२) सात दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- आठवडा

(१३) पंधरा दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
---- पंधरवडा

(१४) तीस दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
------ महिना

(१५) बारा महिन्यांच्या कालावधीस काय म्हणतात ?
----- वर्ष
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५






No comments:

Post a Comment