माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 4 January 2023

महाराष्ट्र राज्य -- सामान्यज्ञान


(१) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती कि. मी. आहे ?
उत्तर -- ७२० कि. मी.
---------------------------
(२) नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे ‌?
उत्तर -- गोदावरी
---------------------------
(३) मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- वाघ
---------------------------
(४) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी 
---------------------------
(५)  रंकाळा तलाव कोठे आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
---------------------------
(६) अजिंठा, वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- औरंगाबाद
---------------------------
(७) आंबोली हे पर्यटनस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
---------------------------
(८) जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे ?
उत्तर -- जलदुर्ग
---------------------------
(९) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद
---------------------------
(१०) साल्हेर व मुल्हेर ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- नाशिक
---------------------------
(११) सप्तश्रृंगी गड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक
---------------------------
(१२) नाशिक जिल्ह्यात विमान तयार करण्याचा कारखाना कोठे आहे ?
उत्तर -- ओझर
---------------------------
(१३) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार 
---------------------------
(१४) धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर -- पांझरा 
---------------------------
(१५)  ' खासबाग ' हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान कोठे आहे ?
उत्तर -- कोल्हापूर 
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday, 3 January 2023

सावित्री तुझ्यामुळेच ........


सावित्री तुझ्यामुळेच मी शाळेत जाते.
सावित्री तुझ्यामुळेच मी वाचन करते
सावित्री तुझ्यामुळेच मी लेखन करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी भाषण करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी नेतृत्व करते.
सावित्री तुझ्यामुळेच मी नाविन्याचा शोध घेते.
सावित्री तुझ्यामुळेच मी जागरूक झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी ज्ञानी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी स्वावलंबी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी जबाबदार झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कष्टाळू झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कार्यतत्पर झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी धीट झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी सुसंस्कृत झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी सुखी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी कौतुकास पात्र झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी अभिमानी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी प्रेरणादायी झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मी राष्ट्रपती झाली.
सावित्री तुझ्यामुळेच मला दूरदृष्टी मिळाली.
सावित्री तुझ्यामुळेच माझी प्रगती झाली.
सावित्री तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला गती आली
----------------------------------
लेखन:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
 जि. प.प्रा.शाळा - जामनेपाडा, रोहोड 
ता.साक्री जि.धुळे
    ९४२२७३६७७५

Sunday, 1 January 2023

पुढील काव्यपंक्ती कोणाच्या ते ओळखा ?


(१) 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले '
----  संत तुकाराम 
---------------------------
' (२) 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी'
---- संत नामदेव 
---------------------------
(३) 'मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा'
---- रामदास स्वामी 
---------------------------
(४) 'कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी'
---- संत सावता महाराज 
----------------------------
(५) 'संस्कृत वाणी देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली ?' 
---- संत एकनाथ 
---------------------------
(६) 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी'
---- संत तुकाराम 
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (!प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे