माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 30 January 2018

उपक्रम :- पाहुणा कोण  ?


उद्देश :- दिलेल्या घटकात न बसणारा शब्द
           ओळखणे.

 सूचना:-खाली काही घटक दिलेले आहेत.
        जसे - नाम,  विशेषण, समानार्थी
        शब्द. प्रत्येक घटकात एक एक शब्द
        त्या घटकात बसणारा नाही. त्यास
        शोधा. हा खेळ कितीही मुलांत खेळता
        येईल. जो अचूक उत्तरे देईल तो जिंकेल.

  (१) सुमित, तुषार, हुशार, सुप्रिया.

  (२) गोड, गूळ, कडू , खारट.

   (३) आई,  माय,  बाप,  माता.

   (४) पाणी,  दगड, जल, जीवन.

   (५) हिमालय, सह्याद्री, उंच, सातपुडा.

    (६) नाम, सर्वनाम, भूतकाळ,  क्रियापद.

   (७) तुम्ही,  गोरे,  आम्ही,  आपण.

   (८) खातो, पितो, करतो, राजू.

   (९)घरदार, गणपत, नफातोटा, तिखटमीठ

   (१०) माती,  मार्ग,  रस्ता,  वाट.

   (११) अरण्य, वन, तापी,  जंगल.

   (१२)भारत, अमेरिका, महाराष्ट्र, चीन.

   (१३) आरती, उमेश, भारती, कीर्ती.

   (१४) काळी,  पाटी,  वही,  पुस्तक,

   (१५) नर्मदा, दयाळू , गंगा, गोदावरी.
==========================
 उत्तरे :- (१) हुशार, (२) गूळ ४ बाप
 (५) दगड  (६)उंच (७) भूतकाळ (८)गोरे
(९)राजू (१०)गणपत(११)माती(१२) तापी
(१३)महाराष्ट्र (१४)काळी (१५)दयाळू

 

पाळीव प्राण्यांची थोडक्यात माहिती


(१) गाय --
  गाय पाळीव प्राणी आहे. गाईचा रंग
  पांढरा,तांबूस किंवा काळा असतो.
  तिला दोन शिंगे असतात. तिचे शेपूट
  गोंडेदार असते. गाईचे डोळे काळेभोर
  व टपोरे असतात. गाय हा खूप उपयुक्त
  प्राणी आहे. गाईपासून आपल्याला दूध
   मिळते.

(२) बैल --
    बैल हा पाळीव प्राणी आहे. त्याचे डोळे
    टपोरे असतात. त्याला दोन शिंगे व
    गोंडेदार शेपूट असते. तो काळ्या,पांढर्‍या
    किंवा तांबूस रंगाचा असतो. तो खूप
    ताकदवान असतो. नांगराला बैल जोडतात.
    बैल नांगर ओढत असतो.

(३) घोडा --
    घोडा हा पाळीव प्राणी आहे. तो देखणा,
    रुबाबदार व मजबूत असतो. घोडा हा
    काळ्या, पांढर्‍या किंवा तांबूस रंगाचा
    असतो. त्याच्या पायांना खूर असतात.
    त्यांना पोलादी नाल ठोकलेली असते.
    घोडा खूप जलद पळतो.

(४) मांजर --
     मांजर हा पाळीव प्राणी आहे.त्याच्या
     अंगावर मऊ केस असतात. त्याचे डोळे
     घारे असतात. मांजराला मिशाही असतात.
     मांजर पांढर्‍या, काळ्या, सोनेरी किंवा
     करड्या रंगाचे असते. ते म्याव् म्याव्
     ओरडते.

(५) उंट --
     उंट हा पाळीव प्राणी आहे. उंटाचे पाय
     खूप उंच असतात. त्याची मान लांब
    असते. पण तोंड आणि कान अगदी
     लहान असल्यामुळे उंट फार विचित्र
    व कुरूप दिसतो. त्यांच्या पाठीवर उंचवटा
    असतो. त्याला मदार म्हणतात. त्याचा
     रंग मळकट असतो. वाळवंटातील लोकांना
    उंटाचा फार उपयोग होतो.

  लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                 📞९४२२७३६७७५

Thursday, 25 January 2018

फक्त नावे सांगा


(१)परांची हालचाल करून पाण्यात
     पोहणारे प्राणी  -- *मासे*

(२)जमिनीवर चालणारे आणि हवेत
     उडणारे प्राणी  -- *पक्षी, झुरळ*.

(३)पायांशिवाय सरपटत जाणारे प्राणी.
     --  *साप, गांडूळ*.

(४)लहान पायांनी सरपटत चालणारे
    प्राणी  --- *सरडा, पाल, कासव*.

(५)चार पायांनी टुणटुण उड्या मारत
    चालणारे प्राणी.  -- *ससा, बेडूक*.

(६) चार पायांनी जमिनीवर चालणारे
    अथवा धावणारे प्राणी -- *कुत्रा,  बैल*.

(७)आकाराने सर्वांत मोठा पक्षी -- *शहामृग*.

(८)वेगाने धावणारा पक्षी -- *शहामृग*.
--- s.  s. chaure ----------------------------

(९)शिंगे असणारे प्राणी -- *हरिण, गाय,गेंडा*.

(१०)आठ पायांचा किडा  --  *कोळी*.

(११)मातीचे कण रचून वारूळ बनवणारे
        प्राणी  -- *मुंग्या*.

(१२)घरटी न बांधणारे पक्षी  -- *कोकिळ*,
        *कोंबडी*.

(१३)अन्न जिभेने पकडणारा आणि न
       चावता गिळणारा प्राणी -- *सरडा*.

(१४)लोकर मुख्यतः या प्राण्यांच्या अंगावरील
      केसांपासून बनवली जाते.  -- *मेंढी*.

(१५) रवंथ करणारे प्राणी  -- *गाय,  म्हैस*.

  संकलक :- *शंकर चौरे*(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि.धुळे
                 📞 ९४२२७३६७७५