(१) सूर्य सकाळी उगवतो.
सूर्य संध्याकाळी मावळतो.
----------------------------------
(२) बदक पाण्यात पोहते.
घार आकाशात उंच उडते.
----------------------------------
(३) उन्हाळ्यात कडक ऊन असते.
हिवाळ्यात थंडी वाजते.
----------------------------------
(४) ऊस गोड असतो.
मिरची तिखट असते.
----------------------------------
(५) चिंचेचे पान छोटे असते.
वडाचे पान मोठे असते.
----------------------------------
(६) कापसापासून कापड बनते.
ऊसापासून साखर बनते.
----------------------------------
(७) मेथी, शेपू, पालक या पालेभाज्या आहेत.
पालेभाज्या नेहमी खाव्यात.
-----------------------------------
(८) गावाबाहेर आमचे शेत आहे.
शेतात बाजरी पेरली आहे.
-----------------------------------
(९) सकाळी लवकर उठावे.
दात घासावेत. स्वच्छ अंघोळ करावी.
-----------------------------------
(१०) सायकलला दोन चाके असतात.
सायकल रस्त्यावरून पळते.
-----------------------------------
(११) आकाशात ढग येतात.
मुसळधार पाऊस पडतो.
सगळीकडे पाणीच पाणी होते.
----------------------------------
(१२) मला दोन हात आहेत.
मी हाताने जेवतो.
मी हाताने लिहितो.
----------------------------------
(१३) आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो.
पाण्याने अंघोळ करतो.
पाण्याने कपडे धुतो, भांडी धुतो.
----------------------------------
(१४) ससा गवत खातो.
ससा भित्रा असतो.
पण तो चपळ असतो.
----------------------------------
(१५) कुत्रा पाळीव प्राणी आहे.
तो घराची राखण करतो.
तो शेताचीही राखण करतो.
----------------------------------
(१६) गाय पाळीव प्राणी आहे.
गाय गवत खाते.
गाय दूध देते.
----------------------------------
(१७) मांजर पाळीव प्राणी आहे.
तिचे अंग मऊ असते.
मांजर दूध पिते.
----------------------------------
(१८) पोपट हा पक्षी आहे.
पोपटाचा रंग हिरवा असतो.
त्याची चोच लाल असते.
----------------------------------
(१९) ज्वारीची भाकरी करतात.
गव्हाची चपाती करतात.
तांदळाचा भात करतात.
डाळीची आमटी करतात.
----------------------------------
(२०) मला दोन पाय आहेत.
पायांनी मी चालतो.
पायांनी मी पळतो,
मी उड्या मारतो.
----------------------------------
(२१) गावातील रस्ता मोठा आहे.
रस्त्यावर वाहने धावतात.
रस्त्याने लोक जातात.
सगळीकडे गर्दी असते.
-----------------------------------------
(२२) हा माझा भारत देश
छान छान माझा देश.
देशात गावे आहेत.
गावात माणसे आहेत.
गावात नदी आहे.
---------------------------------
(२३) थंड हवा सकाळची.
गार हवा रात्रीची.
गरम हवा दुपारची.
ही तर जादू सूर्याची.
नाही कधीच संपायची !
--------------------------------
(२४) घरातील केर दारात नको.
दारातील केर रस्त्यात नको.
सारा केर उचलू या.
कचराकुंडीत टाकू या.
गाव स्वच्छ ठेवू या !
------------------------------------
(२५) दातांना मंजन लावावे.
स्वच्छ तोंड धुवावे.
दररोज अंघोळ करावी.
वाढलेली नखे काढावीत.
स्वच्छ कपडे घालावेत.
------------------------------------
(२६) ही पाहा माझी शाळा.
शाळेभोवती बाग आहे.
बागेत फुलांची झाडे आहेत.
आम्ही झाडांना पाणी घालतो.
आम्ही बागेतील गवत काढतो.
-------------------------------------
(२७) मला दोन हात आहेत.
मी हाताने जेवतो.
मी हाताने नमस्कार करतो.
मी हाताने लिहितो.
मी हाताने काम करतो.
------------------------------------
(२८) गावात घरे आहेत.
गावाबाहेर शेती आहे.
शेतात विहीर आहे.
विहिरीत पाणी आहे.
पाण्यात मासे आहेत.
--------------------------------------
(२९) आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो.
आम्ही पाण्याने अंघोळ करतो.
आम्ही पाण्याने कपडे धुतो.
आम्ही पाणी शेतासाठी वापरतो.
पाणी हे जीवन आहे.
------------------------------------------
(३०) पोपट हा पक्षी आहे.
पोपटाचा रंग हिरवा आहे.
त्याची चोच लाल आहे.
तो विठू विठू बोलतो.
पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात.
==========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
७७२१९४१४९६ / ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment