माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 26 April 2018

विजेचा अपव्यय


  विजेचा गैरवापर आपल्या सर्वांना आणि 
पर्यावरणाला हानिकारक आहे. आज 
वीजनिर्मिती करण्यासाठी पाण्याचा किंवा 
कोळशाचा किंवा अणुऊर्जेचा वापर करण्यात 
येतो. अजूनही सौरऊर्जा तितकी परवडत 
नसल्याने वापरली जात नाही. त्यामुळे ऊर्जा  
निर्मितीसाठी लागणारे साधन संपत्तीचे नुकसान 
लक्षात घेता आपण विजेचा गैरवापर टाळावा. 
  अनेकदा दिवे चालू ठेवणे, फॅन चालू ठेवणे. 
किंवा वीजेवर चालणारे यंत्र विनाकारण सुरू 
ठेवणे अश्या सवयी लागतात. त्या दूर कराव्या.
शाळेत, ट्युशनमध्ये,घरी किंवा कुठल्याही 
सार्वजनिक ठिकाणी आपण वीजेचा गैरवापर 
टाळायची सवय लावूया. 
 पौर्णिमेला चंद्र प्रकाश खूप असतो. त्यावेळी 
विजेचा कमी वापर करावा. चंद्राचा शीतल 
प्रकाश वापरावा. 

 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि. प. प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता.साक्री जि.धुळे 
               📞 ९४२२७३६७७५

Friday, 20 April 2018

आपली संस्कृती आणि पर्यावरण


( आजच राखल पर्यावरणाचे भान, पुढच्या पिढीकडून मिळेल मान )
  ■ घरच्या घरी करता येण्यासारखे....

   बाजारातून कोणतीही गोष्ट खरेदी करताना 
प्लॅस्टिक बॅग्ज ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर 
हा पर्यावरणाला अत्यंत पूरक असा पर्याय आहे. 
प्लॅस्टिक बॅग्ज किंवा प्लॅस्टिक बाटल्यांमुळे 
निसर्गात न जिरणारा कचरा तयार होतो आणि 
तो पर्यावरणाला मारक ठरतो. गाई - म्हशीं -
सारख्या जनावरांच्या खाण्यात या पिशव्या 
येतात आणि अन्ननलिकेत अडकून ही जनावरे 
आपल्या प्राणास मुकतात. अनेकदा प्लॅस्टिक 
बॅग्ज सार्वजनिक नाला किंवा ड्रेनेज मध्ये 
अडकून बसतात आणि बिकट परिस्थिती 
निर्माण होते. तसेच आपण ज्या कागदी पिशव्या 
वापरतो त्या झाडापासून तयार केलेल्या असतात. 
त्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर टाळल्यास 
निसर्गाची हानी काही प्रमाणात कमी होऊ
शकते. या सर्व गोष्टींवर मात करण्यास कापडी 
पिशव्या हा उत्तम उपाय आहे. 

● घरातील जून्या मजबूत कपड्यांच्या पिशव्या 
   शिवल्यास त्या अनेक दिवस आपल्याला 
   वापरता येतात. 

● कमीत कमी पैशात कापडी पिशव्या तयार 
   होऊ शकतात. 

● टिकाऊ असल्यामुळे वारंवार वापर करता 
   येतो व धुऊन स्वच्छ करता येतात. 

● घडी करून त्या कुठेही नेण्यासारख्या 
  असल्यामुळे वापरण्यास कोणत्याही प्रकारचा
   त्रास होत नाही. 

● कापडी पिशव्या कलात्मकरित्या तयार करून 
   विकल्यास महिला बचत गटांसाठी एक उत्तम 
   कुटीर उद्योग उपलब्ध होऊ शकतो. 
-----------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता. साक्री जि. धुळे 
                 📞९४२२७३६७७५

Friday, 13 April 2018

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) कागद बनवण्यासाठी काय वापरतात  ?

उत्तर -- लाकूड किंवा बांबू. 

(२)ऊसाच्या चिपाडांपासून काय तयार करतात ?

उत्तर -- मद्यार्क आणि कागद. 

(३) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता  ?

उत्तर -- शेकरू  ( मोठी खार )

(४) गवताच्या कोणत्या जातीपासून तेल निघते ?

उत्तर -- गवती चहा,  रोशा,  खस. 

(५ ) पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती तास लागतात  ?

उत्तर -- चोवीस तास. 

(६) पृथ्वीवला सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लागतो  ?

उत्तर -- एक वर्ष. 

(७) बर्फाच्या घराला काय म्हणतात  ?

उत्तर --   ' इग्लू '

(८) थर्मामीटरमध्ये भरलेल्या चकचकीत पदार्थाचे नाव सांगा. 

उत्तर --  पारा 

(९) कोळी किड्याला किती पाय असतात  ?

उत्तर -- आठ 

(१०) पंख असणारा पण पिल्लांना दुध पाजणारा प्राणी कोणता  ?

उत्तर --  वटवाघूळ 

(११) वरून काटेरी व आत रसाळ, गोड गरे असलेले फळ कोणते  ?

उत्तर -- फणस. 

(१२) कोणत्या फळाची 'बी ' फळाच्या बाहेर असते  ?

उत्तर -- काजू. 

(१३) जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर -- मिठागर. 

(१४) सिमेंट तयार करण्यासाठी कोणते खनिज वापरतात ?

उत्तर -- चुनखडक .
---------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
               ता. साक्री जि. धुळे 
               ९४२२७३६७७५