माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 31 October 2021

‌आपली राष्ट्रीय प्रतीके(राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा)



(१) राष्ट्रध्वज

----  आपला राष्ट्रध्वज हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. आपल्या राष्ट्रध्वजावर निश्चित संदेश देणारे तीन रंग आहेत. सर्वांत वरच्या बाजूस असणारा केशरी रंग त्याग व शौर्याचा संदेश देतो. मध्यभागी असलेला पांढरा रंग शांतीचा संदेश देतो; तर खालच्या बाजूस असलेला हिरवा रंग समृद्धीचा संदेश देतो. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर असलेले निळ्या रंगाचे अशोक चक्र आपणांस देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश देते.. 
--------------------------------------------------------------
(२) राष्ट्रगीत

---- ‌ 'जनगणमन' हे आपले राष्ट्रगीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत लिहिले आहे. या गीतात त्यांनी भारतातील विविध प्रदेश, नदया व पर्वत यांचे वर्णन केले आहे. राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. म्हणून राष्ट्रगीत सुरू असताना आपण सावधान स्थितीत उभे राहावे. राष्ट्रगीताचा आदर करणे, हे आपले कर्तव्य आहे.
----------------------------------------------------------------
 (३) राजमुद्रा

---- ‌ चार सिंहाकृती असलेली आपली राजमुद्रा हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे. राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली 'सत्यमेव जयते' हे वचन आहे. सर्व नोटा, नाणी, शासकीय पत्रे इत्यादींवर ही राजमुद्रा असते.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

Saturday, 30 October 2021

भारत विशेष -- सामान्यज्ञान ( प्रश्नावली )



(१)भारताचा स्वातंत्र्यदिन कोणता ?
उत्तर -- १५ ऑगस्ट

(२) भारताचा प्रजासत्ताक दिन कोण़ता ?
उत्तर -- २६ जानेवारी

(३) भारताचा राष्ट्रध्वज कोणता ?
उत्तर -- ‌तिरंगा

(४) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर -- जनगणमन

(५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हॉकी

(६) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ

(७) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर -- मोर

(८) भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते ?
उत्तर -- वड

(९) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
उत्तर -- आंबा

(१०) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर -- कमळ

(११) भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?
उत्तर -- गंगा

(१२) भारताचे राष्ट्रीय स्मारक कोणते ?
उत्तर -- ताजमहल

(१३) भारताचे राष्ट्रीयगीत कोणते ?
उत्तर --  वंदेमातरम्

(१४) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
उत्तर -- डॉल्फिन मासा 

(१५) भारताची राष्ट्रभाषा कोणती ?
उत्तर -- हिंदी
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
               जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा ,
              केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Friday, 29 October 2021

सांगा पाहू मी कोण ?


(१)नाहीत पाय, नाहीत हात, तरी पळतो वेगाने

 पाहून मजला भितात लोक, सांगा मी कोण ?
-------------
(२) नाही दिसत डोळ्यांना, नाही लागत हाताला ! 
आहे आजूबाजूला सर्वत्र, ओळखा पाहू मला.
-------------
(३) मी आहे जंगलाचा राजा, चाल तर ऐटबाज, 
आयाळ माझी शान, चटकन तू जाण!
--------------------------------------------------------

(४) दरवर्षी बदलतो पाने, पारंब्यांवर मुले खेळती, 
पक्षांना देतो आधार, धरतो तुम्हांवर छाया.
-------------------------------------------------------
(५) शेताची, घराची करतो राखण, प्रामाणिक म्हणून
 माझी शान,
 वास, आवाजावरून ओळखतो, मिश्राहार घेतो.
============================
उत्तरे :-  (१) साप ,  (२) ‌हवा , (३) सिंह , (४) वड
(५) कुत्रा
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
              जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
               केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि.‌धुळे
               ९४२२७३६७७५