माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 29 October 2021

सांगा पाहू मी कोण ?


(१)नाहीत पाय, नाहीत हात, तरी पळतो वेगाने

 पाहून मजला भितात लोक, सांगा मी कोण ?
-------------
(२) नाही दिसत डोळ्यांना, नाही लागत हाताला ! 
आहे आजूबाजूला सर्वत्र, ओळखा पाहू मला.
-------------
(३) मी आहे जंगलाचा राजा, चाल तर ऐटबाज, 
आयाळ माझी शान, चटकन तू जाण!
--------------------------------------------------------

(४) दरवर्षी बदलतो पाने, पारंब्यांवर मुले खेळती, 
पक्षांना देतो आधार, धरतो तुम्हांवर छाया.
-------------------------------------------------------
(५) शेताची, घराची करतो राखण, प्रामाणिक म्हणून
 माझी शान,
 वास, आवाजावरून ओळखतो, मिश्राहार घेतो.
============================
उत्तरे :-  (१) साप ,  (२) ‌हवा , (३) सिंह , (४) वड
(५) कुत्रा
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
              जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
               केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि.‌धुळे
               ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment