माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 11 November 2017

प्राण्यांचे उपयोग सांगा पाहू  !


(१) मधमाशी :-
--  मधमाशी आपल्या पोळ्यात मध साठवते .
बी व्हॅक्स आणि मध ही मधमाशीपासून
मिळणारी उत्पादने आपल्याला उपयुक्त आहेत.
मधाचा उपयोग खाद्यपदार्थ आणि औषधांत
होतो. मधमाशीमुळे झाडांचे परागीभवन देखील
होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि फळ
बागायतदारांना मधमाशी उपयुक्त आहे.
--------------------------------------------------
(२) मेंढी :-
-- मेंढीपासून मुख्यत्वे लोकर मिळवली जाते.
काही ठिकाणी मेंढीच्या मांसाचा अन्न म्हणून
वापर होतो. थोड्या प्रमाणात मेंढीचे दूधही
मेंढपाळ वापरतात. मेंढीच्या लेंड्यांपासून उत्तम
प्रतीचे लेंडीखत बनते. मेंढ्या झुडपांवर चरत
असल्यामुळे जमीन साफ व्हावी यासाठीही
मेंढ्या सोडल्या जातात.
--------------------------------------------------
(३) गांडूळ :-
-- गांडूळ मातीमध्ये सतत फिरत राहिल्याने व
मातीतील मृत अवशेषांचे ग्रहण व विघटन
करीत असल्याने शेतातील माती भुसभुशीत
होते. गांडूळांच्या साहाय्याने कचऱ्यापासून
गांडूळ खतदेखील बनवले जाते. गांडूळांच्या
वास्तव्याने जमीन सुपीक बनते. म्हणून
गांडूळांना  ' शेतकऱ्याचा मित्र ' असेही म्हटले
जाते.
--------------------------------------------------
(४) कुत्रा :-
-- कुत्र्याला  ' इमानदार ' प्राणी म्हटले जाते.
तो मालकाच्या घराचे व मालमत्तेचे रक्षण करतो.
प्रशिक्षित कुत्रे बाॅम्ब व अमली पदार्थ यांचा शोध
घेऊ शकतात. वासावरून गुन्हेगाराचा मार्ग
काढण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे पोलिसदलात
त्यांचा समावेश असतो. सैन्यातही कुत्रे असतात.
वैद्यकीय संशोधन करताना कुत्र्यांचा वापर होतो.
कुत्र्याला माणसाचा  'चांगला मित्र ' म्हटले आहे.
--------------------------------------------------
(५) याक  :-
-- याकचा वापर मुख्यत्वे डोंगराळ आणि
बर्फाच्छादित प्रदेशात होतो. नेपाळ आणि
तिबेटमध्ये याकचा वापर शेतनांगरणीसाठी
होतो. वाहतुकीसाठी देखील याकचा उपयोग
होतो.  याकचे दूध आणि दुधापासून बनवलेले
' चुर्पी ' नावाचे चीझ व लोणी यांचा मोठ्या
प्रमाणावर तिबेटमध्ये वापर करतात. याकच्या
विष्ठेचा इंधन (शेण्या) म्हणूनही वापर केला
जातो.
--------------------------------------------------
 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा -बांडीकुहेर
                ता. साक्री जि. धुळे
                ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment