उपक्रम
बालमित्रांनो, आपल्या जेवणात आपण कितीतरी
विविध पदार्थ खात असतो. त्यांच्या विविधतेमुळे
आपल्या जेवणास एक आगळीस चव येते. पण
बरं का बालमित्रांनो, या जेवणातल्या पदार्थांना
केवळ आपल्या 'ताटामध्ये ' मध्ये करमत नाही.
ते करायला निघतात फेरफटका ! अन् तोही
चक्क वेगवेगळ्या गावांना ! काही खाद्यपदार्थंना
तर ती गावं इतकी आवडतात की, ते त्या गावांच्या
नावात जाऊन बसतात.
मी तुम्हांला काही गावाची नावे देणार आहे.
त्या गावाच्या नावामध्ये खाद्यपदार्थ लपवून
बसलेली आहेत. ते शोधा व सांगा.
● खेळ खेळण्यासाठी गावांची काही नावे
पुढीलप्रमाणे.
*गावाचे नाव* *खाद्यपदार्थ*
(१) शिवपुरी - पुरी
(२) वरणगाव - वरण
(३) इचलकरंजी - करंजी
(४) अलंकापुरी - पुरी
(५) लोणीकाळभोर - लोणी
(६) येरवडा - वडा
(७) शेवगाव - शेव
(८) गणेशपुरी - पुरी
(९) कुडाळ - डाळ
(१०) शिरवडे - वडे
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment