अलंकारिक शब्द
(१) अष्टपैलू व्यक्ती.
--- अनेक विषयांत तरबेज.
(२) अठराविश्वे दारिद्र्य .
--- अतिशय गरिबीची स्थिती.
(३) अंगठाछाप.
--- निरक्षर मनुष्य, अंगठाबहाद्दर.
(४) अजातशत्रू.
--- शत्रू नसलेला/ सर्वांचा मित्र.
(५) एका माळेचे मणी.
--- सारख्या वृत्तीची माणसे.
(६) कत्तलची रात्र.
--- अतिशय घाईची रात्र.
(७) कळीचा नारद.
--- लावालाव्या करणारा.
(८) कळसूत्री बाहुले.
--- स्वतःची बुध्दी नसलेला मनुष्य.
(९) कागदी घोडे.
--- व्यर्थ खटाटोप.
(१०) काडीपहिलवान.
--- हाडकुळा मनुष्य.
(११) कायापालट.
--- एकदम बदल.
(१२) कावळ्याचा शाप.
--- नीच माणसाने केलेली निंदा.
(१३) काळाबाजार.
--- खोटा व्यवहार.
(१४) कोंडयाचा मांडा.
--- वाईटातून चांगले.
(१५) खो खो चा खेळ.
--- अनिश्चिततेची स्थिती.
(१६) खोगीरभरती.
--- संख्या फुगविण्यासाठी जमा केलेले.
(१७) गंगाजमुना .
--- अश्रू.
(१८) गनिमी कावा.
--- आडमार्गाने शत्रूला जेरीस आणणे.
(१९) गरूडाची झेप.
--- दूरवरची दृष्टी.
(२०) गळ्यातली धोंड.
--- लादलेले ओझे.
(२१) गळ्यातील ताईत.
--- अतिशय आवडती व्यक्ती.
(२२) घाण्याचा बैल.
--- सतत कामास जुपलेला माणूस.
(२३) घोडामैदान.
--- कसोटीची वेळ.
(२४) चांडाळचौकडी.
--- दुष्ट माणसांची टोळी.
(२५) छत्तीसचा आकडा.
--- दोघांत अत्यंत वितुष्ट.
(२६) जख्मेवर मीठ.
--- आधीच्या दुःखात पुन्हा अपमान.
(२७) जिवाची मुंबई.
--- खूप चैन करणे.
(२८) झाकली मूठ.
--- झाकून ठेवलेले व्यंग.
(२९) टांगती तलवार.
--- सतत भीतीची जाणीव.
(३०) तळहातावरचा फोड.
--- अतिशय प्रिय व्यक्ती.
(३१) ताकापुरते रामायण.
--- कामापुरती खुशामत.
(३२) तारेवरची कसरत.
--- सावधगिरीने करावयाचे काम.
(३३) दगडावरची रेघ.
--- खोटी न ठरणारी गोष्ट.
(३४) नंदीबैल.
--- हो स हो करणारा मनुष्य.
(३५) पाण्यावरील बुडबुडा.
--- क्षणभंगुर गोष्ट.
(३६) पायीची वहाण.
--- योग्य स्थानी योग्य वस्तू.
(३७) पिकले पान.
--- म्हातारा मनुष्य.
(३८) लक्ष्मणरेषा.
--- मर्यादा
(३९) रिंगमास्तर.
--- आपल्या मताप्रमाणे इतरांना वागविणारा.
(४०) स्वल्पविराम.
--- क्षणभर विश्रांती.
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment