माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 23 November 2017

भाषिक खेळ

🔺 'ळी ' या अक्षराने संपणारा दोन अक्षरी
        शब्द शोधा.

(१)फूल उमलण्याआधीची अवस्था - कळी
(२)पिकावर पडणारी किडी --अळी
(३)गालावर पडणारा खड्डा --खळी
(४)ऊसापासून साखर बनवल्यावर उरते- मळी
(५) बंदूकीला असते --नळी
(६) पंचपात्राची सोबतीण --पळी
(७) एका हाताने वाजत नाही --टाळी
(९) बागेचा देखभाल करतो --माळी
(१०) भांड्याचा एक प्रकार --थाळी
(११) तूर /मुगाच्या करतात --डाळी
(१२) करवंदांची असते -- जाळी
(१३)भाजी चिरण्यासाठी वापरतात --विळी
(१४) फाल्गुन महिन्यातील एक सण- होळी 
(१५)आठ पाय असलेला किडा --कोळी
(१६)भिक्षा मागण्यासाठी उपयोगी --झोळी
(१७)चोरांची/ दरोडेखोरांची --  टोळी
(१८)होळी सणाला केला जाणारा पदार्थ -पोळी
(१९) लाकडाची बांधतात --मोळी
(२०) पुस्तकात शब्दांच्या असतात --ओळी
(२१)फांद्या नसलेली वनस्पती -- केळी
(२२) एक पाळीव प्राणी -- शेळी
(२३)एकत्र जन्माला आलेली -- जुळी
(२४) साडी सोबत असते -- चोळी
             
     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प. प्रा.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि.धुळे
                  ९४२२७३५७७५
  

No comments:

Post a Comment