विषय :- परिसर अभ्यास. इयत्ता - तिसरी
-------------------------------------------------
प्रश्न :- एका वाक्यात उत्तरे सांगा.
१.आपल्या परिसरातील सजीवांची पाच
नावे सांगा.
२.आपल्या परिसरातील निर्जीव वस्तूंची
पाच नावे सांगा.
३. चिमण्या काय खातात ?
४. तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात.
५. सोंड असलेला प्राणी कोणता ?
६. घराची राखण करणारा प्राणी कोणता ?
७. शेतीच्या कामात मदत करणारा प्राणी
कोणता ?
८. पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा
प्राणी कोणता ?
९. अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता ?
१०. वाळवंटातील जहाज असे कोणत्या
प्राण्याला म्हणतात ?
११. मेंढ्या कशासाठी पाळतात ?
१२. वेगाने पळणा-या प्राण्यांची नावे सांगा.
१३. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते ?
१४.आपल्याला दूध कोणकोणत्या प्राण्यांपासून
मिळते ?
१५. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?
१६. ' कोळी ' किड्याला किती पाय असतात ?
१७. बिळात कोणकोणते प्राणी राहतात ?
१८.पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची नावे सांगा ?
१९. पाण्यात विरघळणा-या पदार्थांची नावे सांगा.
२०. फुगा फुगवतांना फुग्यात तुम्ही काय भरता ?
२१. कोणत्या ऋतूत आमरस केला जातो ?
२२. मुख्य दिशांची नावे सांगा.
२३. उपदिशांची नावे सांगा.
२४. पूर्व दिशेच्या समोरील दिशा कोणती ?
२५. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती ?
२६. पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग
होतो ?
२७. तुमच्या जिल्ह्य़ाचे नाव सांगा.
२८. तुमचे गाव कोणत्या तालुक्यात येते ?
२९. काळाचे प्रकार सांगा.
३०. काळ मोजण्याची साधने कोणती ?
३१.शेती व्यवसायास लागणारी अवजारे
कोणती ?
३२. गावात कोणकोणत्या वास्तू असतात ?
३३. गाव कसे तयार होते ?
३४. रस्त्यावरील वाहतुकीची साधने कोणती ?
३५.लोहमार्गावरील वाहतुकीची साधने कोणती ?
३६. जलमार्गावरील वाहतुकीची साधने कोणती ?
३७. हवाईमार्गावरील वाहतुकीची साधने
कोणती ?
३८. संदेशवहनांची प्रमुख साधने कोणती ?
३९. कोणत्याही दोन घाटांची नावे सांगा.
४०. कोणत्याही दोन नद्यांची नावे सांगा.
४१. वनस्पतीच्या मुख्य अवयवांची नावे सांगा.
४२. एका आठवड्याचे दिवस किती ?
४३. भारतीय सौर वर्षाचे महिने किती ?
४४. ग्रेगरियन वर्षाचे महिने किती ?
४५. भूरूपांची नावे सांगा.
४६. पाय नसणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.
४७.कोणकोणत्या वनस्पतींपासून धागे मिळतात
४८. धरण कशाला म्हणतात ?
४९. वनांत कोणकोणते प्राणी आढळतात ?
५०. वर्षाचे मुख्य ऋतू कोणते ?
५१. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
५२. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
५३. आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
५४. घरटी बांधण्यासाठी पक्षी कशाकशाचा
वापर करतात ?
५५. घरटी न बांधणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगा.
५६.आपल्या जेवणातील मुख्य अन्नपदार्थ
कोणते ?
५७. पाण्याचे कोणकोणते उपयोग आहेत ?
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते
ReplyDeleteआयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते
Deleteआयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते
ReplyDeleteआयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते
ReplyDelete