● ताणतणाव कमी करण्यासाठी पुढील मार्ग आहेत.
(१) सुसंवाद :-
--- मित्र - मैत्रिणी, समवयस्क, भाऊ - बहिणी,
शिक्षक व पालक या सर्वांशी सुसंवाद साधणे
म्हणजेच आपले मन मोकळे करणे, याने
ताणतणाव कमी होतो.
(२) लेखन :-
--- मनातले विचार लिहून काढले आणि
आपल्या चुकीच्या विचारांचे विश्लेषण केले
तरीही ताण कमी होतो.
(३) छंद जोपासणे :-
--- वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण,
दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला,
शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य आणि
छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही
आणि रिकामा वेळदेखील सत्कारणी लागतो.
सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवावे.
त्यामुळे नकारात्मक भावना कमी होतात.
(४) हास्यमंडळ :-
--- एकत्र जमून मोठ्यामोठ्याने व मनमोकळे
हसून आपला ताण हलका करता येतो.
(५) संगीत :-
- संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यांमुळे
आनंद मिळून ताण हलका होतो. संगीतात
मनः स्थिती बदलण्याची ताकद असते.
(६) मैदानी खेळ व व्यायाम :-
-- मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी
खेळांमुळेसुधारते. खेळांमुळे शारीरिक व्यायाम,
शिस्त, इतरांशी आंतरक्रिया,संघभावना वाढणे,
एकाकीपणा संपून व्यक्ती समाजाभिमुख होणे
असे अनेक फायदे असतात. योगाचा पण सराव असावा.
(७) निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण, पाळीव
संगोपन यानेही ताण कमी होतो.
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
9422736775