होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेला
असतो. होळी हा एक महत्वाचा सण आहे.
होळीला ' शिमगा ' असेही म्हणतात.
होळीचा सण दोन दिवस साजरा करतात.
होळीच्या दिवशी ठरलेली जाग सारवून
त्या ठिकाणी एक मोठा खड्डा खणतात.
मध्यभागी झाडाची फांदी उभी करतात.
त्याच्या आजूबाजूला लाकडे व गोव-या रचून
होळी तयार करतात.संध्याकाळी होळी पेटवून
तिची पूजा करतात. तिला नैवेद्य अर्पण
करतात.
होळी म्हणजे हुताशनी देवी आहे असे
मानतात. ती होळी-बरोबर सर्व वाईटांचा
जाळून नाश करते असा समज आहे. वर्गणी
काढून सार्वजनिक होळीही अनेक ठिकाणी
साजरी करतात.
होळीच्या दुसर्या दिवसाला धुलीवंदन
म्हणतात. त्या दिवशी रंग उडवून खेळ खेळतात.
एकमेकांच्या अंगावर रंग उडवायला खूप मजा
वाटते. दोन्ही दिवस गोडाचे जेवण करतात व
आनंदाने होळीचा सण साजरा करतात.
===========================
लेखन:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment