माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 8 March 2019

परिसरातील व्यवसाय व कारागीरांची माहिती घेऊया


(१) शेतकरी -
---  शेतकरी अनेक प्रकारची धान्ये पिकवतो.
     भात, कापूस व  ताग यांची लागवड करतो.

(२) कुंभार -
---   कुंभार मातीची मडकी,  कुंड्या व पणत्या तयार करतो.

(३) सुतार --
---  सुतार दरवाजे, खिडक्या, कपाटे, खुर्च्या
     वगैरे लाकडाच्या वस्तू तयार करतो.

(४) गवंडी --
---  गवंडी घरासाठी विटांच्या भिंती रचतो.

(५) शिंपी --
---  शिंपी निरनिराळ्या तऱ्हेचे कपडे शिवतो.

(६) शिक्षक --
---  शिक्षक मुलांना शिकवून त्यांना ज्ञान देतात.

(७) डाॅक्टर --
---  डाॅक्टर आजारी लोकांना औषध देऊन बरे करतात.

(८) चांभार --
---  चांभार चामड्याच्या चपला, बूट व बॅगा बनवतो.

(९) सोनार --
---   सोनार सोन्या - चांदीचे निरनिराळे दागिने बनवतो.

(१०) बुरूड --
---   बुरूड बांबू , गवत यांच्या चट्या,  टोपल्या व तट्टे तयार करतो.

(११) विणकर  (कोष्टी ) --
---   विणकर  (कोष्टी ) हातमाग व यंत्रमाग यांवर  कापड विणतो.

(१२) लोहार --
---   लोहार कडी -कोयंडे, कोयते इत्यादी लोखंडाच्या वस्तू तयार करतो.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775

1 comment: