माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 19 August 2019

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) कळ लावणे
--- भांडण लावणे.

(२) आहुती देणे.
---  बलिदान देणे.

(३) उत्तेजन देणे.
---  प्रोत्साहन देणे.

(४) हुलकावणी देणे.
---  फसवणे.  / चकवणे.

(५) हात जोडणे.
---  नम्रपणे विनंती करणे.

(६) सैरावैरा पळणे.
---  वाट मिळेल तिकडे पळणे.

(७) वाहवा करणे.
---  स्तुती करणे.  / कौतुक करणे.

(८) वचपा काढणे.
---  बदला घेणे.  / सूड घेणे.

(९) बाजी मारणे.
---  विजयी होणे.  / यशस्वी होणे.

(१०) नष्ट करणे.
---    नाहीसे करणे.

(११) धडकी भरणे.
---    खूप भीती वाटणे.

(१२) नाराज होणे.
---    निराश होणे.

(१३) दिवस फिरणे.
---   वाईट दिवस येणे.

(१४) झुंबड उडणे.
---    गर्दी होणे.

(१५) चेहरा खुलणे.
---    आनंद होणे.

(१६) कान टवकारणे.
---   सावध होणे.

(१७) नवल वाटणे.
---    आश्चर्य वाटणे. / चकित होणे.

(१९) पाय धरणे.
---    माफी मागणे.  / शरण जाणे.

(२०) उदरनिर्वाह करणे.
---    पोट भरणे.
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा.शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री,  जि. धुळे
            ९४२२७३६७७५

5 comments: