(१) जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना
आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता
यावेत, म्हणून २१ सप्टेंबर हा दिवस संयुक्त
राष्ट्रांतर्फ ' आंतरराष्ट्रीय शांतता दिन ' म्हणून
जगभर साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त
राष्ट्रांचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात,
स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता घंटा
वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली
जाते. सुमारे ६० देशांतील लोकांनी दिलेल्या
नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आली आहे.
--------------------------------------------------
(२) सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युतनिर्मिती
करणाऱ्या बॅटरीही असतात. त्यांना " सौरघट "
म्हणतात.
सूर्याची उष्णता, वाहते वारे हे कधीही न संपणारे
आहेत. त्यांच्यापासून वीजनिर्मिती केल्यास प्रदूषण
होत नाही, परंतु या पध्दती खूप महाग आहेत;
मात्र कुठल्याही पध्दतीने वीजनिर्मिती करण्यासाठी
पर्यावरणातील साधनांचा वापर होतो. याशिवाय
खर्च हा येतोच. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या
ऊर्जेचा वापर कमीत कमी प्रमाणात करण्याची
सवय होणे हे आजच्या जगात गरजेचे आहे.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment