माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 28 August 2019

आगगाडी,अग्निबाण,  सायकल,संगणक यांची वैज्ञानिक स्पष्टीकरणात माहिती

(१) आगगाडी --

--- आगगाडी हे दळणवळणाचे महत्त्वाचे साधन
आहे. प्रवासी गाडी व मालवाहक गाडी असे
आगगाडीचे दोन प्रकार आहेत. आगगाडी अतिशय
जड वजन नेण्यास सक्षम असते. सुरूवातीला
आगगाडीत वाफेचे इंजिन वापरत असे. आता
इलेक्ट्रीक इंजिन व डिझेल इंजिन सुध्दा वापरात
आहे. बुलेट ट्रेन हा आगगाडीचा आधुनिक प्रकार
आहे. आगगाडी लोखंडापासून बनलेल्या रुळावरून
धावते.
----------------------------------------------------

(२) अग्निबाण --

---   अग्निबाणाच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रह
अवकाशात सोडले जातात. अग्निबाणात अतिशय
ज्वलनशील इंधन ठासून भरले जाते. त्याचे ज्वलन
होतांना तो वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावतो.
अग्निबाणाचे प्रक्षेपण करतांना वेळेची उलट मोजणी
केली जाते व शून्य झाल्यास त्याचे प्रक्षेपण केलं
जाते. अवकाशात जाण्यासाठी आता आधुनिक
अग्निबाणांचा  वापर केला जातो.

--------------------------------------------------

(३) सायकल --

---  सायकल हे वाहतुकीचे तसेच खेळाचे दुचाकी
वाहन आहे.  सायकल हे शारीरिक शक्तीने चालते.
त्याला कुठल्याही  प्रकारच्या इंधनाची गरज नाही.
सायकलमुळे प्रदूषण होत नाही. सायकलने शारीरिक
व्यायाम होतो. आधुनिक सायकलचा शोध
स्काॅटलंडच्या मॅकमिलन नावाच्या लोहाराने लावला.

--------------------------------------------------

(४) संगणक --

---  संगणक हे एक यंत्र आहे.  सीपीयू , माऊस हे
त्याचे भाग आहे.  त्याला हार्डवेअर असे म्हणतात.
संगणकाची बुध्दी शुन्य आहे. तो बनविलेल्या
प्रोग्रामप्रमाणे काम करतो. त्याच्या मदतीने आपण
जलद गतीने आकडेमोड करू शकतो. त्यामध्ये
मोठ्या प्रमाणात माहिती साठविता येते. आज
प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर केल्या जातो.
भारताचा पहिला सुपर कम्प्युटर परम हा विजय
भटकर यांनी बनविला.
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक )
            पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment