माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3280960

Wednesday, 21 August 2019

म्हणजे काय ? (भौगोलिक थोडक्यात माहिती )

(१) ऋतु  :-
-- बदलत्या हवेनुसार आपल्याकडे वर्षाचे तीन भाग पडतात, त्यांना ऋतू म्हणतात.

(२) ऋतुचक्र :-
-- उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु
एकामागून एक येत राहतात. ऋतूंच्या या बदलास ऋतुचक्र म्हणतात.

(३) हवामान  :-
-- हवेतील उष्णता, थंडी, दमटपणा, कोरडेपणा, त्याचप्रमाणे ऊन, वारा, ढग, पाऊस या सर्व घटकांचा विचार करून एखाद्या ठिकाणच्या हवेची एकूण परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणचे हवामान होय.

(४) सम हवामान :-
-- एखाद्या ठिकाणी उन्हाळ्यात फार उष्णता नसते व हिवाळ्यात खूप थंडी नसते, हवामानाच्या अशा
स्थितीत सम हवामान म्हणतात.

(५) विषम हवामान  :-
-- एखाद्या ठिकाणी उन्हाळ्यात खूप उष्णता असते व हिवाळ्यात खूप थंडी असते, हवामानाच्या अशा स्थितीस विषम हवामान म्हणतात.

(६) दमट हवा :-
--- ज्या हवेत बाष्प जास्त असते, अशा हवेस दमट हवा म्हणतात.
    

(७) कोरडी हवा  :-
---  ज्या हवेत बाष्प कमी असते, अशा हवेस कोरडी हवा म्हणतात.

(८) बाष्पीभवन :--
---  सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ (बाष्प ) होते,
      या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात. 

(९) जलचक्र  :--
---  सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ
होते. ती वाफ हवेमध्ये मिसळते. अशी बाष्प
असलेली हवा वर गेल्यावर थंड होऊन तिचे ढग तयार होतात. त्या ढगांपासून पाऊस पडतो. पावसाचे जे पाणी जमिनीच्या उतारावरून वाहते, त्यातील काही पाणी नदीतून वाहत जाऊन परत समुद्राला मिळते. या पाण्याची पुन्हा वाफ होते. अशी क्रिया सतत होत असते, या क्रियेला जलचक्र म्हणतात.
==============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            पिंपळनेर ता. साक्री,  जि. धुळे
            ९४२२७३६७७५
    

No comments:

Post a Comment