● जवळच्या प्राणीसंग्रहालयास भेट द्या किंवा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांची यादी
करा व त्यांची वैशिष्ट्ये लिहा.
■ परिसरात आढळणारे प्राणी - त्यांची वैशिष्ट्ये -
(१) कुत्री
--- कुत्रीला चार पाय, दोन कान, एक शेपूटअसते. कुत्री ही पिल्लांना जन्म देते. ती पाळीव प्राणी आहे. घराची राखण करण्याचे काम कुत्री करते. कुत्री भू भू असा आवाज करते.
--------------------------------------------------
(२) गाय --
--- गायीला चार पाय, दोन कान, एक शेपटी असते. गाय ही पा प्राणी आहे. ती पिल्लांना जन्म देते. गायीपासून दूध मिळते. या दुधापासून अनेक
दुग्धजन्य पदार्थ तयार होतात. गाय हंबरते.
--------------------------------------------------
(३) मांजर --
--- मांजरीला दोन कान, चार पाय, एक शेपटी असते.
तिचे डोळे घारे असतात. तिचे खाद्य घरातील उंदीर
असते. घरातील दूधही तिचे आवडते खाद्य आहे.
मांजर म्यॅव म्यॅव असा आवाज करते.
--------------------------------------------------
(४) गाढव --
--- गाढव हा खाली मान घालून सरळ चालणारा
प्राणी आहे. हा पाळीव प्राणी आहे. याचा उपयोग
कुंभार माती व ओझे वाहून आणण्यासाठी करतो.
गाढवाचा ओरडण्याचा आवाज विचित्र असतो.
गाढव ड्यॅचू ड्यूॅचू असा आवाज करून करून
ओरडतो.
--------------------------------------------------
(५) बकरी --
--- बकरी ही कळपाने राहणारा प्राणी आहे.
ही पाळीव प्राणी आहे. यापासून दूध मिळते.
तिच्या विष्टेपासून खत तयार केले जाते. बकरी
बॅ बॅ असा आवाज करते.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा .शिक्षक)
पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
मला पहिली व दुसरी साठी उपक्रम घ्यायचे आहेत
ReplyDelete