माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 23 August 2019

शब्दाबद्दल शब्दसमूह (मराठी शब्द सौंदर्य )


(१) अजिंक्य --
---  ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा.

(२) अतुलनीय --
---  ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे.

(३)असाध्य --
---  जे साध्य होणार नाही असा.

(४) अपूर्व --
---  पूर्वी कधीही घडले नाही असे.

(५) अटळ --
---  न टाळता येणारे.

(६)आदिवासी --
---  अगदी पूर्वीपासून राहणारे.

(७) आस्तिक --
---  देव आहे असे मानणारा.

(८) उत्क्रांती --
---  हळूहळू घडून येणारा बदल.

(९) उदयोन्मुख --
---  उदयाला येत असलेला.

(१०) कर्तव्यदक्ष --
---  कर्तव्यात तत्पर असणारा.

(११) क्रांती --
---  कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल.

(१२) कृष्णपक्ष --
---   काळोख्या रात्रीचा पंधरवडा.

(१३) पुरोगामी --
---  आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा.

(१४) मितभाषी --
---   मोजकेच बोलणारा.

(१५) शाश्वत --
---   कायम टिकणारे.

(१६) शुक्लपक्ष --
---   चांदणे असलेला पंधरवडा.

(१७) हुतात्मा --
देशासाठी /समाजासाठी आपले प्राण अर्पण करणारा .

(१८) सुभाषित --
---   बोधवचन.

(१९) स्वच्छंदी --
---   स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वैरपणे वागणारा.

(२०) पूरग्रस्त --
---   पूरांमुळे नुकसान झालेले लोक.

(२१) नास्तिक --
---   ईश्वर नाही असे मानणारा.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
           पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
           ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment