(१) चंद्रापासून येणारा प्रकाश.
--- चांदणे
(२) लग्नात द्यावयाची भेट.
--- आहेर
(३) गुप्त बातम्या काढणारा.
--- गुप्तहेर
(४) नाणी तयार करण्याचा कारखाना.
--- टंगसाळ
(५) सापाचा खेळ करणारा.
--- गारूडी
(६) फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरूंद वाट.
--- पाऊलवाट
(७) तीन रस्ते एकवटतात ती जागा.
--- तिठा
(८) अस्वलाचा खेळ करणारा.
--- दरवेशी
(९) पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ.
--- पेय
(१०) दगडावर कोरलेला लेख.
--- शिलालेख
(११) नव-या मुलाची आई.
--- वरमाय
(१२) चांदणे असलेला पंधरवडा.
--- शुक्लपक्ष
(१३) अंधा-या रात्रीचा पंधरवडा.
--- कृष्णपक्ष
(१४) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख.
--- ताम्रपट
(१५) चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
--- बेट
(१६) माकडाचा खेळ करून दाखवणार.
--- मदारी
(१७) चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
--- चौक
(१८) कविता करणारा / रचणारा.
--- कवी
(१९) कविता करणारी.
--- कवयित्री
(२०) कुस्ती खेळण्याची जागा.
--- आखाडा
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Mahadev salunkhe
ReplyDelete