माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 14 December 2020

विषय - मराठी (भाषा) उतारा वाचा व लिहा.

 
(१) गायी गोठ्यात बांधतात.
पक्षी घरट्यात राहतात.
उंदीर बिळात राहतो.
वाघ गुहेत राहतो.
कोंबड्यांसाठी खुराडे असते.
----------------------------------
(२) सूर्य सकाळी उगवतो.
सूर्याचा प्रकाश पडतो.
दुपारी ऊन कडक असते.
सूर्य संध्याकाळी मावळतो.
रात्री अंधार पडतो.
--------------------------------------------------
(३) वारा वाहतो.
आकाशात ढग येतात.
मुसळधार पाऊस पडतो.
सगळीकडे पाणीच पाणी होते.
सर्वांना आनंद होतो.
-------------------------------------------------
(४) ऊस गोड असतो.
मिरची तिखट असते.
चिंच आंबट असते.
कारले कडू असते.
आवळा तुरट असतो.
-----------------------------------------------
(५) ज्वारीची भाकरी करतात.
गव्हाची चपाती करतात.
तांदळाचा भात करतात.
डाळीची आमटी करतात.
साबुदाण्याची खिचडी करतात.
-----------------------------------------------
(६) कच्चा आंबा म्हणजे कैरी.
कैरी आंबट असते.
कैरीचे लोणचे करतात.
कैरी पिकली की पिवळी होते.
पिकलेल्या आंब्याचा रस करतात.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment