माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3272479

Wednesday, 30 December 2020

निसर्ग सृष्टी (समानार्थी शब्द )

डोंगर पर्वत अचल
रान वन जंगल

गड तट दुर्ग
वाट रस्ता मार्ग

देव परमेश ईश्वर
चहूकडे सर्वत्र चौफेर

पूजा अर्चा सेवा
पवन वायू हवा

आकाश गगन अंबर
गृह सदन घर

माऊली माय माता
रयत प्रजा जनता

वंदन प्रणाम नमन
आनंद संतोष समाधान

आदिम आदि अगोदर
आस्था जिव्हाळा आदर

पशू प्राणी जनावर
भ्रमण सहल विहार

निसर्ग सृष्टी प्रकृती
ख्याती प्रसिद्धी कीर्ती

आठवण स्मरण स्मृती
जमीन धरा धरती

प्रतिक चिन्ह खूण
मर्यादा निर्बंध भान

भूमी धरत्री धरणी
कथा गोष्ट कहाणी

पुरातन पूर्वीचा प्राचीन
संपत्ती पैसा धन

तीरकामठा धनू धनुष्य
एकी एकता ऐक्य

थोरवी मोठेपणा महिमा
शीव वेस सीमा

भाऊबंद नातेवाईक आप्त
मित्र सवंगडी दोस्त

रीती रिवाज प्रघात
सकल सर्व समस्त
================================
लेखक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५


No comments:

Post a Comment