ब्लॉग भेटी.
Saturday, 12 December 2020
स्पर्धा परीक्षा प्रश्नावली
(१) महाराष्ट्र पोलिस दलाचे बीद्र वाक्य कोणते ? उत्तर -- सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
(२) वंदे मातरम् गीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी
(३) ' जय जवान जय किसान ' हे उद्गार कुणाचे होते ?
उत्तर -- लाल बहादूर शास्त्री
(४) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठे राज्य कोणते ?
उत्तर -- राजस्थान
(५) महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वोच्च पद कोणते ?
उत्तर -- पोलिस महासंचालक
================================
( ६) एका चौरसाच्या बाजूची लांबी ८ से. मी. आहे. तर
त्याची परिमिती किती ?
उत्तर -- ३२ से. मी.
(७) जर ५ मुले ५ पाने ५ मिनिटात लिहितात, तर १
मुलगा १ पान किती मिनिटात लिहिल ?
उत्तर -- १ मिनिट
(८) ४ माणसे एक काम ८ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ८ माणसे किती दिवसांत करतील ?
उत्तर -- ४ दिवस
(९) दोन संख्यांचा गुणाकार १२० आहे. त्यापैकी एक संख्या १२ असल्यास दुसरी संख्या कोणती ?
उत्तर -- १०
(१०) एक दोरी ६ ठिकाणी कापली असता, तिचे किती तुकडे होतील ?
उत्तर -- ७ तुकडे
=================================
(११) विद्युत प्रवाहाचे एकक कोणते ?
उत्तर -- अॅम्पियर
(१२) डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे ?
उत्तर -- आवाजाची तीव्रता
(१३) मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड ( फिमीर )
(१४) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
(१५) प्लेग हा आजार कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ?
उत्तर -- उंदीर
=================================
(१६) नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
उत्तर -- गोदावरी
(१७) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
(१८) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
(१९) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपुर
(२०) माउंटअबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- राजस्थान
================================
(२१) ' पाणी ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- जल
(२२) मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
उत्तर -- दर्पण
(२३) कविता राऊत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू ( अॅथेलेटिक्स )
(२४) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?
उत्तर -- देवनागरी
(२५) ' केसाने गळा कापणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ
सांगा ?
उत्तर -- विश्वासघात करणे
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment