माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 11 December 2020

समानार्थी शब्द / विरूध्दार्थी शब्द प्रश्नावली


(१) ' वृक्ष ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- झाड

(२) ' कच्चा ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- पक्का

(३) ' माय ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- आई

(४) ' दिवस ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- रात्र

(५) ' बंधू ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- भाऊ

(६) ' निर्जीव ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- सजीव

(७) ' नेत्र ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- डोळा

(८) ' धीट ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- भित्रा

(९) ' मोर ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- मयूर

(१०) ' पारतंत्र्य ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- स्वातंत्र्य

(११) ' मूषक ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- उंदीर

(१२) 'ओले ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- सुके

(१३) ' मेघ ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- ढग

(१४) ' बेरीज ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- वजाबाकी

(१५) ' मानव ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- मनुष्य

(१६) ' गरीब ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- श्रीमंत
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment