ब्लॉग भेटी.
Tuesday, 8 December 2020
समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द सांगा.
(१) मोळी कशाची ? उत्तर -- लाकडांची
(२) तांडा कोणाचा ?
उत्तर -- उंटांचा
(३) गठ्ठा कशाचा ?
उत्तर -- पुस्तकांचा
(४) जाळी कशाची ?
उत्तर -- करवंदांची
(५) थवा कुणाचा ?
उत्तर -- पक्ष्यांचा
(६) घड कशाचा ?
उत्तर -- केळ्यांचा
(७) तुकडी कोणाची ?
उत्तर -- सैनिकांची
(८) संघ कोणाचा ?
उत्तर -- खेळाडूंचा
(९) राई कशाची ?
उत्तर -- आंब्याच्या झाडांची
(१०) जुडगा कशाचा ?
उत्तर -- किल्ल्यांचा
(११) झुपका कशाचा ?
उत्तर -- केसांचा
(१२) पेंढी कशाची ?
उत्तर -- गवताची
(१३) रास कशाची ?
उत्तर -- धान्याची
(१४) ढीग कशाचा ?
उत्तर -- नारळांचा
(१५) पुडके कशाचे ?
उत्तर -- नोटांचे
(१६) जुडी कशाची ?
उत्तर -- पालेभाजीची
(१७) थप्पी कशाची ?
उत्तर -- पोत्यांची
(१८) गुच्छ कशाचा ?
उत्तर -- फुलांचा
(१९) उतरंड कशाची ?
उत्तर -- मडक्यांची
(२०) कळप कोणाचा ?
उत्तर -- मेंढ्यांचा
(२१) टोळी कुणाची ?
उत्तर -- चोरांची
(२२) जमाव कोणाचा ?
उत्तर -- माणसांचा
(२३) संच कशाचा ?
उत्तर - प्रश्नपत्रिकांचा
(२४) घोळका कुणाचा ?
उत्तर -- मुलांचा
(२५) वृंद कशाचा ?
उत्तर -- वाद्यांचा
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment