माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 1 May 2021

महाराष्ट्र विशेष -- सामान्यज्ञान


(१) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर -- १ मे १९६०

(२) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६

(३) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर -- १ मे

(४) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई

(५) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?
उत्तर -- नागपूर

(६) महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत ?
उत्तर -- सहा

(७) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसुबाई

(८) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी

(९) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?
उत्तर -- शेकरू

(१०) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे ?
उत्तर -- हरियाल / हरावत

(११) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी

(१२) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर -- मुंबई शहर

(१३) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर

(१४) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
उत्तर -- यशवंतराव चव्हाण

(१५) महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता ?
उत्तर -- आंबा

(१६) महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल कोणता ?
उत्तर -- ताम्हन / मोठा बोंडारा

(१७) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
उत्तर -- गंगापूर ( नाशिक )

(१८) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले

(१९) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?
उत्तर -- श्री. प्रकाश

(२०) महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- गडचिरोली

(२१) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?
उत्तर -- तारापूर ( ठाणे )

(२२) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?
उत्तर -- खोपोली ( रायगड )

(२३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?
उत्तर -- कर्नाळा ( रायगड )

(२४) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?
उत्तर -- ताजमहल, मुंबई

(२५) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ?
उत्तर -- मुंबई
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment