माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3280269

Sunday, 9 May 2021

माता माय (शब्द साथी ) / समानार्थी शब्द


आई माय माता
काळजी फिकीर चिंता
पुत्र मुलगा नंदन
आनंद संतोष समाधान

अनर्थ अरिष्ट संकट
रस्ता मार्ग वाट
दुःखी कासावीस व्याकूळ
उषा प्रातःकाळ सकाळ

धैर्य धाडस हिंमत
साथ सोबत संगत
बिकट अवघड कठीण
अंतर हृदय अंतःकरण

यातना दुःख वेदना
खूण इशारा सूचना
हित कुशल कल्याण
घर निवास सदन

जनक बाप जन्मदाता
अर्धांगिनी पत्नी कांता
नारी महिला वनिता
कन्या मुलगी सुता

दूध पय क्षीर
दिवस दिन वार
सखा स्नेही सोबती
प्रेम लोभ प्रीती

चतुर कसबी हुशार
देव परमेश्वर ईश्वर
अंत शेवट अखेर
सुरेख रम्य सुंदर
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment