माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 15 May 2021

घरदर्शक / समूहदर्शक / पिलूदर्शक शब्द प्रश्नावली

 
(१) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे

(२) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा

(३) गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरू

(४) मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- वारूळ

(५) गाई - गुरांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- खिल्लार / कळप

(६) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा

(७) म्हशीच्या घराचे नाव काय ?
उत्तर -- गोठा

(८) आंब्याच्या झाडाच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- राई

(९) माणसाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- लेकरू

(१०) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ

(११) हरणांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- कळप

(१२) ' पाडस ' कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर -- हरण

(१३) पोपट पिंज-याशिवाय आणखी कुठे राहतो ?
उत्तर -- ढोलीत

(१४) शेळीच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- करडू

(१५) रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गंजी
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
पिंपळनेर ता साक्री जि धुळे
9422736775



No comments:

Post a Comment