माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3270765

Wednesday, 15 November 2023

बिरसा मुंडांना प्रणाम

आमुचे प्रणाम बिरसा मुंडांना
त्या थोर धरतीआबा क्रांतीसूर्यांना  |

आदिवासींचे झाले वाली
डोंगरदरीत ज्योत लाविली 
आदिवासीस जाग आणिली
दिली एक नवी प्रेरणा
आमुचे प्रणाम बिरसा मुंडांना

डोंगरदरीत आदिवासींना
कुणीच नव्हता वाली 
इंग्रजानी अत्याचार केला 
बिरसांनी उलगुलान नारा दिला 
आमुचे प्रणाम बिरसा मुंडांना 

आदिवासी समाजाचे कैवारी
दीन दुबळ्याचे रक्षणकारी
निसर्गाशी जोडून नाता
आदिवासींचे बनले युगनिर्माता 
आमुचे प्रणाम बिरसा मुंडांना 

आदिम संस्कृतीची घेता आन
झाले शहिद आदिवासी जवान
संस्कृती आमची बलवान
आम्हा आहे बिरसाचा अभिमान 
आमुचे प्रणाम बिरसा मुंडांना

वीर बिरसा मुडांच्या
बलिदानाची अमर कहाणी
भारतीयांच्या ओठांवर अन्
इतिहासाच्या पानोपानी
आमुचे प्रणाम बिरसा मुंडांना 
=======================
कवी / लेखक :-  शंकर सिताराम चौरे
काकरपाडा ता. साक्री जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment