माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3272924

Saturday, 18 November 2023

आठवणीतील मालतीआई (मालतीबाई पवार )


मालती आई तुझे उपकार थोर
आम्हांस दिलेस आकार
छान तुझे संस्कार 
आई महती तुझी गात राहणार  

मालती आई येते तुझी आठवण
मन नाही मानत तुझे हे नसलेपण
आदर्श आयुष्य असे घडविलेस
मालती नाव सोनेरी केलेस 

मालती आई तू विशाल वटवृक्ष
दिली वात्सल्य सावली
पवार कुटुंबाच्या मार्गावर
उभी होती संस्काराची माऊली 

मालती आई तू ममतेचं आभाळ
करित होतीस प्रेमाचं सिंचन
दिली माया होऊन चंदन 
बहरे पवार कुटुंबाचं अंगण 

मालती आई खूप तुझे ऋण
जगी होती तू महान 
आई तू साक्षात परमेश्वर 
तुझ्या मायेचं काय मोल देणार 
=====================
लेखक / कवी :- शंकर चौरे
काकरपाडा ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment