माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 27 April 2022

दुय्यम न्यायालयाचे पुढील प्रकार



दुय्यम न्यायालयाचे पुढील प्रकार 
(१) दिवाणी न्यायालय 
(२) फौजदारी न्यायालय
 (३) महसूल न्यायालय
(४) ग्राहक न्यायालय
 (५) बालगुन्हेगार न्यायालय.

  (१) दिवाणी न्यायालय :--

 ----- संपत्ती व आर्थिक बाबींशी निगडित बाबींची सुनावणी ज्या न्यायालयात केली जाते, त्यास दिवाणी न्यायालय असे म्हणतात. जिल्हा आणि त्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयात असे खटले चालवले जातात, जिल्हा स्तरावरील दिवाणी खटले चालवणाऱ्या न्यायाधीशास जिल्हा न्यायाधीश असे म्हणतात.
----------------------------------------------------------
(२) फौजदारी न्यायालय :--

 ----- खून, दरोड, बलात्कार इत्यादी स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांची सुनावणी ज्या न्यायालयात केली जाते, त्यास फौजदारी न्यायालय असे म्हणतात जिल्हा स्तरावरील फौजदारी न्यायालयास सत्र न्यायाधीश असे म्हणतात. कनिष्ठ स्तरावरील फौजदारी न्यायालये स्थापन केली जातात. कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा फर्मावण्याचा अधिकार या न्यायालयांना असतो.
----------------------------------------------------------
(३) महसूल न्यायालय :--

 ----- भूधारणा आणि जमीन महसूलविषयक वादांची सुनावणी करण्यासाठी आणि त्या बाबतीत न्यायनिवाडा करण्यासाठी ब्रिटिश राजवटीत महसूल न्यायालय स्थापन करण्यात आली. त्या विषयाचे अधिकार जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंडल अधीक्षक या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कनिष्ठ महसूल न्यायालयां निर्णयांचा फेरविचार करण्याचा अधिकार जिल्हा स्तरावरील महसूल न्यायालयास असतो.
----------------------------------------------------------
(४) ग्राहक न्यायालय : --

----- ग्राहक संरक्षण कायदयातील नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी करण्यासाठी ग्राहक न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा, राज्य आणि अखिल भारतीय स्तरावर अशी न्यायालये कार्यरत आहेत. ज्या व्यक्ती/संस्थेच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असेल, त्यास आरोप सिद्ध झाल्यास, नुकसानभरपाई किंवा/आणि दंड ठोठावल्याचा अधिकार या न्यायालयांना देण्यात आला आहे.
----------------------------------------------------------
(५) बालगुन्हेगार न्यायालय :--

 सन २००० च्या बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार वयाची ७ ते १७ या वयोगटातील गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवरील खटले हे न्यायालय चालवते. या बालगुन्हेगारांना सुरक्षा, काळजी व पुनर्वसनाची गरज असते, त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात येते.
==================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -- जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता‌. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday, 26 April 2022

भाषा ज्ञान ( इंग्रजी -- मराठी भाषाज्ञान )



(1)  ' मुझिक ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संगीत

(2) ' कॅप्टन ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- कर्णधार

(3) ' कंप्युटर ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संगणक

(4)  ' नर्स ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- परिचारिका

(5) ' हाॅस्पिटल ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- रुग्णालय

(6) " डाॅक्टर ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- वैद्य

(7) ' मोबाईल ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- भ्रमणध्वनी

(8) ' मेसेज ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संदेश

(9) ' वेबसाइट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संकेतस्थळ

(10) ' टेक्नॉलॉजी ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- तंत्रज्ञान

(11) ' ग्राउंड ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता  ?
उत्तर -- मैदान

(12) ' पेशंट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- रूग्ण
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Monday, 25 April 2022

भौगोलिक सामान्यज्ञान (प्रश्नावली)



(१) सूर्यमालेत किती ग्रह आहेत ?
उत्तर -- आठ

(२) सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर -- गुरू

(३) भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता ?
उत्तर -- आर्यभट्ट

(४) आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?
उत्तर -- पृथ्वी

(५) लालसर रंगाचा ग्रह कोणता ?
उत्तर -- मंगळ

(६) कडीवाला ग्रह कोणत्या ग्रहास म्हणतात ?
उत्तर -- शनी

(७) सजीव सृष्टी असलेला ग्रह कोणता ?
उत्तर -- पृथ्वी

(८) सूर्यमालेतील एकमेव तारा कोणता ?
उत्तर -- सूर्य

(९)  पृथ्वी कशी आहे ?
उत्तर -- गोल

(१०) सूर्यापासून आपणांस कोणत्या दोन गोष्टी मिळतात ?
उत्तर -- प्रकाश व उष्णता

(११) पहाटेचा तारा असे कोणत्या ग्रहास म्हणतात ?
उत्तर -- शुक्र

(१२) सूर्यप्रकाश पृथ्वीच्या किती भागावर पडतो ?
उत्तर -- निम्म्या
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५