दुय्यम न्यायालयाचे पुढील प्रकार
(१) दिवाणी न्यायालय
(२) फौजदारी न्यायालय
(३) महसूल न्यायालय
(४) ग्राहक न्यायालय
(५) बालगुन्हेगार न्यायालय.
(१) दिवाणी न्यायालय :--
----- संपत्ती व आर्थिक बाबींशी निगडित बाबींची सुनावणी ज्या न्यायालयात केली जाते, त्यास दिवाणी न्यायालय असे म्हणतात. जिल्हा आणि त्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयात असे खटले चालवले जातात, जिल्हा स्तरावरील दिवाणी खटले चालवणाऱ्या न्यायाधीशास जिल्हा न्यायाधीश असे म्हणतात.
----------------------------------------------------------
(२) फौजदारी न्यायालय :--
----- खून, दरोड, बलात्कार इत्यादी स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांची सुनावणी ज्या न्यायालयात केली जाते, त्यास फौजदारी न्यायालय असे म्हणतात जिल्हा स्तरावरील फौजदारी न्यायालयास सत्र न्यायाधीश असे म्हणतात. कनिष्ठ स्तरावरील फौजदारी न्यायालये स्थापन केली जातात. कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा फर्मावण्याचा अधिकार या न्यायालयांना असतो.
----------------------------------------------------------
(३) महसूल न्यायालय :--
----- भूधारणा आणि जमीन महसूलविषयक वादांची सुनावणी करण्यासाठी आणि त्या बाबतीत न्यायनिवाडा करण्यासाठी ब्रिटिश राजवटीत महसूल न्यायालय स्थापन करण्यात आली. त्या विषयाचे अधिकार जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंडल अधीक्षक या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कनिष्ठ महसूल न्यायालयां निर्णयांचा फेरविचार करण्याचा अधिकार जिल्हा स्तरावरील महसूल न्यायालयास असतो.
----------------------------------------------------------
(४) ग्राहक न्यायालय : --
----- ग्राहक संरक्षण कायदयातील नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी करण्यासाठी ग्राहक न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा, राज्य आणि अखिल भारतीय स्तरावर अशी न्यायालये कार्यरत आहेत. ज्या व्यक्ती/संस्थेच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असेल, त्यास आरोप सिद्ध झाल्यास, नुकसानभरपाई किंवा/आणि दंड ठोठावल्याचा अधिकार या न्यायालयांना देण्यात आला आहे.
----------------------------------------------------------
(५) बालगुन्हेगार न्यायालय :--
सन २००० च्या बाल न्याय कायद्यातील तरतुदीनुसार वयाची ७ ते १७ या वयोगटातील गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवरील खटले हे न्यायालय चालवते. या बालगुन्हेगारांना सुरक्षा, काळजी व पुनर्वसनाची गरज असते, त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात येते.
==================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -- जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment