माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 30 March 2017

दिवाळी विशेष विचारधारा

            🔹दिवाळी विशेष विचारधारा 🔹

      लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे

(१)नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा
प्रदूषणमुक्त दिवाळी करा,संसार होईल सुखाचा.

(२)दोन वाती, एक ज्योती
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणार सौभाग्यवती

(३)धरतीमाता- धरतीमाता वंदन करते तुला
  प्रदूषणमुक्त दिवाळी करीन आशीर्वाद दे मला.

(४) तुळशीपुढे लावा दिवा,आज धनत्रयोदशी
     प्रदूषणमुक्त दिवाळी हेच मागणे तुळशीपाशी.

(५ वसुंदरेच्या मंदिरात दिवा तेवतो मंद
प्रदूषणमुक्त दिवाळीने जीवनात फुलला सुगंध.

(६) गुलाबाचे फूल दिसायला ताजे
     प्रदूषणमुक्त दिवाळी करणे सौभाग्य माझे

(७) नको मोह ,नको मत्सर हेवा
    सण साजरे करतांना पर्यावरणाचा भान ठेवा.

(८)ऊन ,पावसाच्या खेळात हसतं इंद्रधनुष्य
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करून वाढवा आयुष्य
    

(९) संसारात सदा राहीन आनंदी
    पर्यावरणाशी मैत्री करायला हीच संधी.

(१०) आपले राष्ट्रगीत आहे जनगणमन      
पर्यावरण रक्षणासाठी अर्पण करीन तन-मन -धन
      

(११)मानवाला जन्म देणारी निसर्गमाता
  पर्यावरणाचे सदा रक्षण करीन सर्वांनकरिता

             लेखन :- शंकर चौरे
                        पिंपळनेर
                        ता.साक्री जि.धुळे
                         📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment