माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 30 March 2017

हसत खेळत गणिती शिक्षण


    🔹हसत खेळत गणिती शिक्षण🔹
       🔼तोंडी गणिते, तोंडी शब्द 🔼

    संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
                   ¤ ९४२२७३६७७५ ¤

  तोंडी गणिते सांगून उत्तर सांगावयास लागणे.
तोंडी गणित अवघडात अवघड नसावे. मुलांना
आनंद वाटावा. व्यवहारातील गणिते असावी.
सामुदायिक उत्तर स्विकारू नये.

उदा :-
(१) भाजीवाल्याकडे मेथीच्या १५ गड्या
भाजीच्या होत्या. त्याने ५ भाजीच्या गड्या
विकल्या, तर भाजीवाल्याकडे किती शिल्लक
राहिल्या ?

(२)सानियाच्या आईने दोन मुलांना ७-७ आंबे
   दिले. तर दोघांना मिळून किती आंबे दिले ?

(३) सुमितच्या आईने टोपलीत २० आंबे ठेवले
  होते. दोन मुलांनी प्रत्येकी ६ -६ खाल्ले. तर
  टोपलीत किती आंबे शिल्लक राहिले  ?

(४) १ दिवसाचे २४ तास असतात, तर दोन
    दिवसाचे तास किती  ?

(५) ६० सेकंदाचा १ मिनिट होतो, तर ३०
     मिनिटांचे सेकंद किती  ?

(६)एका बाटलीत १ लीटर पाणी असते, तर
   २५ बाटल्यात किती लीटर पाणी असेल ?

(७) एका झाडावर ९ पोपट होते. त्यामधील
    ५ उडून गेले. तर झाडावर किती पोपट
    राहिले ?

(८) एका डब्यात १ किलो साखर होते.
    त्यातील ५०० ग्रम साखर वापरली. तर
    डब्यात किती साखर शिल्लक राहिली ?

(९) एका पेरूच्या झाडावर १०० पेरू होते.
   त्यामधून ६० पेरू तोडले, तर किती पेरू
   शिल्लक राहातील  ?

      संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                     पिंपळनेर
                      ता.साक्री जि. धुळे
                      📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment