माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 30 March 2017

क्रीडा - पुरस्कार

                  🎖 क्रीडा - पुरस्कार🏅

      संकलक :- शंकर चौरे  (पिंपळनेर ) धुळे
                       ९४२२७३६७७५

शासकीय पातळीवर पुढील क्रीडा-पुरस्कार
देण्यात येतात :

(१) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार :-
  केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात
येतो. खेळाशी संबंधित कोणत्याही स्वरूपातील
अत्यंत महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दर वर्षात
एका खेळाडूची निवड या पुरस्कारासाठी
केली जाते.

(२) अर्जुन पुरस्कार :-
  दरवर्षी विविध खेळात विशेष चमकदार
कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अर्जुन
पुरस्काराने गौरवण्यात येते. हा पुरस्कारही
केंद्र सरकारतर्फे देण्यात येतो.

(३) द्रोणाचार्य पुरस्कार :-
  केंद्र सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
देशातील सर्वोत्तम क्रीडा प्रशिक्षकास हा
पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

(४) छत्रपती पुरस्कार :-
  महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील खेळाडूला
त्याच्या विशेष कामगिरीबद्दल हा पुरस्कार
देण्यात येतो.

(५) दादोजी कोंडदेव पुरस्कार :-
  महाराष्ट्रातील सर्वोत्तम क्रीडा प्रशिक्षकास हा
पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतो.

          संकलक :- शंकर चौरे
                         पिंपळनेर
                         ता.साक्री जि. धुळे
                         📞  ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment