माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 30 March 2017

भाषिक खेळ

                  🔹 भाषिक खेळ 🔹

                       📘 शब्दशोध  📕

        संकलक :- शंकर चौरे  (पिंपळनेर)  धुळे

  तुम्हांला एक वाक्य देणार आहे. त्याचा अर्थ
लक्षात घेऊन तीन अक्षरी शब्द असणारा उत्तर
सांगायचं आहे. या तीन अक्षरांपैकी प्रत्येक
शब्दात  'वड ' शब्द असणार आहे.

(१) ही तर वस्तूंची चळत.
उत्तर --------    चवड

(२) म्हणजे तर रूची.
उत्तर ---------    आवड

(३) हे तर पाणी वाहून नेण्याचे साधन.
उत्तर --------   कावड

(४) हा तर फुरसतीचा वेळ.
उत्तर --------   सवड

(५) ही तर नापसंती.
उत्तर -------- नावड

(६) ही तर अनेकांतून करावयाची पसंती.
उत्तर --------- निवड.

(७) ही तर छोटी विहीर.
उत्तर --------- बावड

        संकलक :- शंकर चौरे
                       पिंपळनेर
                       ता.साक्री जि.धुळे
                       📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment