माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 30 March 2017

साम- दाम -दंड- भेद म्हणजे काय?

    🔹साम- दाम -दंड- भेद म्हणजे काय?

      ┄─┅━━▣▣▣━━┅─•
  संकलक:- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
              ¤ ९४२२७३६७७५ ¤
      ┄─┅━━▣▣▣━━┅─•

  हे शब्द म्हणजे एकेक तत्त्व वा नियम
आहेत. आपल्या पारंपरिक राजनीतिशास्त्रात
प्रतिस्पर्ध्याशी कसे वागावे, संघर्षाचा प्रसंग
आल्यास काय करावे,याचे उत्कृष्ट मार्गदर्शकन
केले गेले आहे. वरील शब्दसमूह म्हणजे अशी
मार्गदर्शक तत्त्वे किंवा नियम होत.

(१) साम :-
--- साम म्हणजे सामोपचार. प्रतिस्पर्ध्याशी
सर्वप्रथम सामोपचाराची बोलणी करावी.
एकाएकी संतप्त होऊन संघर्षाला उभे
ठाकू नये.

(२) दाम :-
--- दाम म्हणजे पैसा, संपत्ती. प्रतिस्पर्धी
सामोपचाराने ऐकत नसेल, तर त्याला दाम
देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा.

(३) दंड :-
--- दंड म्हणजे शिक्षा.प्रसंगी युद्ध करण्याची
वेळ आली, तर युद्ध करावे.

(४)भेद :-
--भेद म्हणजे भिन्नभाव, दुरावा. प्रतिस्पर्ध्याशी
सामोपचाराची बोलणी करूनही तो ऐकत
नसेल, तर या टप्प्यावर त्याच्याशी असलेले
शत्रुत्व उघडपणे मान्य करावे आणि त्यानुसार
पावले उचलावीत.

   ✍ शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
        जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
        ता.साक्री जि.धुळे
       📞 ९४२२७३६७७५

1 comment:

  1. Tejas Patil Pimpalner
    ।। साम,दाम,दंड,भेद ।।💪🙏👑

    ReplyDelete