चौरे भाऊ, चौरे ताई
थाटामाटात आले
जमले होते एक दिवस
तरी डोळे ओले
भावबंद म्हणाले; भाऊ -ताई
बोलावे काहीतरी
पूर्वजांच्या आठवणी
काढू काही तरी
एका बाबांनी
चौरे परिवाराची सांगितली गोठ
भाऊबंदांनो रक्ताची जोडूया नाती
वाडवडिलांच्या आशीर्वादानं मिळतील नातीगोती
एक दिवस भाऊबंदांसंग
छान घालवला वेळ
मेळाव्याच्या निमित्तानं
झाला पूर्वजांचा मेळ
किती नाच, किती गाणे
ढोल पावरीत धुंद राहणे
कोकणी समाजाची गाणी गायली
त्यातून आपली संस्कृती पाहिली
चौरे मेळावा सोडतांना
आलं पापणीत पाणी
जेव्हा परतलो घरी
आठवण येते कितीतरी
काय सांगू
चौरे मेळाव्याच्या आठवणी
आठवण सांगतांना
उर येतं भरूनी
म्हणून दरवर्षी जावे
चौरे मेळाव्याला आठवण करूनी
भेट घ्यावी भाऊबंदांची
वाट पहावी पुढच्या मेळाव्याची
कवी :- शंकर चौरे(काकरपाडा, पिंपळनेर)
९४२२७३६७७५ - धुळे
========================
मार्गदर्शक :- महारू चौरे सर (पिंपळनेर )
९४२१५२७७२२
No comments:
Post a Comment