माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3285493

Saturday, 25 January 2020

शब्द स्नेही (समानार्थी शब्द)


झेंडा ध्वज निशाण
सुंदर सुरेख छान
वंदन प्रणाम नमन
जवान युवक तरूण

सैन्य फौज दल
आश्चर्य अचंबा नवल
तरबेज निपुण कुशल
महा विराट विशाल

युध्द लढाई समर
शर बाण तीर
चाणाक्ष हुशार चतुर
भूषण दागिना अलंकार

प्रतिज्ञा शपथ वचन
गरीब दीन निर्धन
विश्व जग भुवन
घर गृह सदन

नीलकंठ मोर मयूर
अवधी वेळ अवसर
पराक्रमी योध्दा वीर
किमया जादू चमत्कार

गौरव अभिनंदन सन्मान
प्राचीन पूर्वीचा पुरातन
कठीण दुर्धर गहन
संपदा संपत्ती धन
======================
लेखन:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment