माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 24 January 2020

आपला देश --आपले संविधान


(१) भारतीय संविधान म्हणजे काय  ?

---    लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार चालवण्यासाठी संविधानाची गरज होती. त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या सभेने स्वीकारलेल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली. भारतीय संविधान हे लिखित स्वरूपात असून त्यात भारतीय नागरिकांचे हक्क स्पष्ट केलेले आहेत. तसेच नागरिकांची कर्तव्येही सांगितली आहेत. संविधानात दिलेल्या नियमांनुसार आपले प्रतिनिधी राज्यकारभार करतात.
---------------------------------------------------------

(२) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण का साजरा करतो.

--  आपल्या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास २६ जानेवारी १९५० पासून सुरूवात झाली. म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
--------------------------------------------------

(३) आपल्या देशाची कोणती तीन संरक्षक दले दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होतात  ?

---  प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भूदल, नौदल आणि हवाईदल ही देशाची तीन संरक्षक दले  सहभागी होतात.
-----------------------------------------------------

(४)भारतीय संविधान का निर्माण करण्यात आले ?

--- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी संविधान निर्माण करण्यात आले आहे . राज्यकारभार करताना लोकप्रतिनिधी संविधानातील नियमांचा आधार घेतात. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही. संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्येही सांगितली असल्याने नागरिकांनाही संविधानाचा उपयोग होतो.
=============================
संकलन :-  शंकर सिताराम चौरे ( प्रा.शिक्षक)
               पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
                ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment