माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 17 January 2020

म्हणजे काय ? (समानार्थी शब्द )

मार्ग म्हणजे वाट
अंत म्हणजे शेवट 
उदर म्हणजे पोट
रुबाब म्हणजे थाट 

शरीर म्हणजे काया 
प्रेम म्हणजे माया 
सावली म्हणजे छाया 
क्षमा म्हणजे दया 

पान म्हणजे पर्ण 
जुने म्हणजे जीर्ण 
कान म्हणजे कर्ण 
कनक म्हणजे सुवर्ण 

कन्या म्हणजे लेक 
वचक म्हणजे धाक 
क्षुधा म्हणजे भूक 
बगळा म्हणजे बक 

खेद म्हणजे खंत 
दात म्हणजे दंत 
संकल्प म्हणजे बेत 
गाणे म्हणजे गीत 

त्रास म्हणजे छळ 
यातना म्हणजे कळ 
विस्तव म्हणजे जाळ 
अवधी म्हणजे वेळ 

पाषाण म्हणजे खडक 
गवई म्हणजे गायक 
कपाळ म्हणजे मस्तक 
भेद म्हणजे फरक 

ग्राम म्हणजे गाव 
होडी म्हणजे नाव 
कागद म्हणजे ताव 
प्रेत म्हणजे शव 

दुनिया म्हणजे जग 
रोष म्हणजे राग 
शरीर म्हणजे अंग 
मेघ म्हणजे ढग 

युवती म्हणजे तरूणी 
गोष्ट म्हणजे कहाणी 
भूमी म्हणजे धरणी 
नीर म्हणजे पाणी 

मर्कट म्हणजे वानर 
युध्द म्हणजे समर
सज्ज म्हणजे तयार 
प्रवास म्हणजे सफर

लेखन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक) धुळे 
        ९४२२७३६७७५ - पिंपळनेर,  साक्री 

No comments:

Post a Comment