माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 30 December 2020

निसर्ग सृष्टी (समानार्थी शब्द )

डोंगर पर्वत अचल
रान वन जंगल

गड तट दुर्ग
वाट रस्ता मार्ग

देव परमेश ईश्वर
चहूकडे सर्वत्र चौफेर

पूजा अर्चा सेवा
पवन वायू हवा

आकाश गगन अंबर
गृह सदन घर

माऊली माय माता
रयत प्रजा जनता

वंदन प्रणाम नमन
आनंद संतोष समाधान

आदिम आदि अगोदर
आस्था जिव्हाळा आदर

पशू प्राणी जनावर
भ्रमण सहल विहार

निसर्ग सृष्टी प्रकृती
ख्याती प्रसिद्धी कीर्ती

आठवण स्मरण स्मृती
जमीन धरा धरती

प्रतिक चिन्ह खूण
मर्यादा निर्बंध भान

भूमी धरत्री धरणी
कथा गोष्ट कहाणी

पुरातन पूर्वीचा प्राचीन
संपत्ती पैसा धन

तीरकामठा धनू धनुष्य
एकी एकता ऐक्य

थोरवी मोठेपणा महिमा
शीव वेस सीमा

भाऊबंद नातेवाईक आप्त
मित्र सवंगडी दोस्त

रीती रिवाज प्रघात
सकल सर्व समस्त
================================
लेखक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५


Saturday, 26 December 2020

महाराष्ट्र -- सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) कोणत्या किल्ल्यावर मेंढातोफ व दुर्गा तोफ आहे ?
उत्तर -- दौलताबाद (देवगिरी )

(२) प्रसिद्ध कैलास लेणे कोठे आहे ?
उत्तर -- वेरूळ 

(३) मिग विमाने तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे ?
उत्तर -- ओझर (नाशिक)

(४) ' हत्तीरोग ' संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- वर्धा 

(५) बुलढाणा जिल्ह्यात ' सिंदखेड राजा ' येथे कोणाचा राजवाडा आहे ?
उत्तर -- श्री. लखुजीराव जाधव 

(६) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अमरावती 

(७) आनंदवन प्रकल्प ' कोठे आहे ?
उत्तर -- वरोडा ( चंद्रपूर )

(८) नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- संत्री 

(९) मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी कोणती ?
उत्तर -- धारावी 

(१०) पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते ?
उत्तर -- गुजरात 

(११) पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते ?
उत्तर -- दादरा नगर हवेली 

(१२) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे ?
उत्तर -- रायगडावर 
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड 
ता. साक्री , जि. धुळे 
९४२२७३६७७५

Friday, 25 December 2020

संख्यालेखन


संख्या या देवनागरी, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हांत
वेगवेगळ्या प्रकारे लिहितात. त्यांची ओळख व्हावी या दृष्टीने येथे माहिती दिली आहे.
देवनागरी         आंतरराष्ट्रीय         रोमन
१                       1                         I
२                       2                        II
३                       3                        III
४                       4                         IV
५                       5                         V
६                       6                         VI
७                       7                        VII
८                        8                       VIII
९                        9                       IX
१०                     10                      X
११                     11                     XI
१२                      12                     XII
१३                      13                    XIII
१४                      14                    XIV
१५                      15                      XV
१६                       16                     XVI
१७                      17                     XVII
१८                      18                     XVIII
१९                      19                     XIX
२०                      20                     XX
३०                      30                    XXX
४०                     40                     XL
५०                     50                      L
१००                  100                    C
५००                   500                   D
१०००               1000                   M
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday, 23 December 2020

विशेष सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणते ?
उत्तर -- भारतरत्न

(२) भारताचा सर्वोच्च शौर्य पदक कोणते ?
उत्तर -- परमवीर चक्र

(३) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणते ?
उत्तर -- ज्ञानपीठ पुरस्कार

(४) भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणते ?
उत्तर -- दादासाहेब फाळके पुरस्कार

(५) भारताच्या नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ?
उत्तर -- नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

(६) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होते ?
उत्तर -- इंदिरा गांधी

(७) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील

(८) भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण ?
उत्तर -- सरोजनी नायडू

(९) भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?
उत्तर -- सुचेता कृपलानी ( उत्तर प्रदेश)

(१०) भारतातील सर्वांत मोठे राज्य (क्षेत्रफळाने) कोणते ?
उत्तर -- राजस्थान

(११) भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळाने) कोणते ?
उत्तर -- गोवा

(१२) भारतातील सर्वात मोठी चर्च कोणती ?
उत्तर -- से कॅथेड्रल ( गोवा )
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५

Saturday, 19 December 2020

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन आहे ?
उत्तर -- सत्यमेव जयते.

(२) ' ग्रामगीता ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर -- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

(३) ' चले जाव ' ही घोषणा कोणी दिली ?
उत्तर -- महात्मा गांधी

(४) ' मिसाईल मॅन ' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
उत्तर -- डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

(५) 'अंजली भागवत ' ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी

(६) 'मिल्खा सिंग ' हे कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहेत ?
उत्तर --- धावपटू

(७) ' लोकमान्य ' असे कोणाला संबोधतात ?
उत्तर --- बाळ गंगाधर टिळक

(८) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा

(९) 'भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर -- वंदे मातरम्

(१०) 'श्यामची आई ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
उत्तर -- साने गुरुजी

(११) ' रामायण ' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर -- महर्षी वाल्मिकी

(१२) ' शाहू महाराजांना कोणती उपाधी लावली जाते ?
उत्तर -- राजर्षी
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री , जि धुळे
. ९४२२७३६७७५

Thursday, 17 December 2020

मराठी भाषा

             
उपक्रम --- शब्द खजिना

● दिलेल्या अक्षराने सुरू होणारे पाच शब्द सांगा /लिहा.

(१) क
--- कळ कप कण कमळ कळी

(२) ख
--- खण खत खडक खराटा खजूर

(३) ग
--- गट गवत गरज गजरा गरूड

(४) घ
--- घर घट घड घडा घरटी

(५) च
--- चव चटई चरण चमचा चपळ

(६) छ
--- छगन छकडा छडा छत्री छप्पर

(७) ज
--- जग जड जगन जतन जठर

(८) झ
--- झगा झड झडप झडी झरझर

(९) ट
--- टपाल टकटक टकमक टपकन टरबूज

(१०) ठ
--- ठग ठसा ठरा ठराव ठणका
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

गणितीय शाब्दिक उदाहरणे


(१) ८ मजूर एक काम १६ दिवसांत पूर्ण करतात, तेच
काम १६ मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?

उत्तर --- ८ दिवस
---------------------------------

(२) दहावीच्या वर्गातील ६० मुलांपैकी ७५ टक्के मुले
पास झाली , तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती ?

उत्तर --- १५ मुले
-------------------------------------

(३) २०० पानांच्या पुस्तकाचा ५० टक्के भाग वाचून
संपविला, तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची
शिल्लक राहतील ?

उत्तर --- १०० पाने
--------------------------------------------------------------------

(४) एका चादरीची किंमत ५० रूपये आहे. या प्रमाणे ५०० रूपयांमध्ये किती चादरी येतील ?

उत्तर -- १० चादरी
--------------------------------------------------------------------

(५) दर दोन मीटरवर एक खांब याप्रमाणे एकूण ६० मीटर अंतरात किती खांब रोवता येतील ?

उत्तर -- ३१ खांब
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday, 16 December 2020

म्हणजे काय ? ( समानार्थी शब्द )


जंगल म्हणजे वन
भूमी म्हणजे जमीन
अरण्य म्हणजे रान
आकाश म्हणजे गगन

बाग म्हणजे उद्यान
ढग म्हणजे घन
दिवस म्हणजे दिन
पर्ण म्हणजे पान

संपत्ती म्हणजे धन
डोळा म्हणजे नयन
महा म्हणजे महान
कर्ण म्हणजे कान

घर म्हणजे सदन
गृह म्हणजे भवन
वस्त्र म्हणजे वसन
सोने म्हणजे कांचन

आहार म्हणजे भोजन
दुष्ट म्हणजे दुर्जन
देहान्त म्हणजे निधन
हत्या म्हणजे खून

वारा म्हणजे पवन
मासा म्हणजे मीन
नेत्र म्हणजे लोचन
नूतन म्हणजे नवीन

लोक म्हणजे जन
उदास म्हणजे खिन्न
दंग म्हणजे मग्न
विद्या म्हणजे ज्ञान
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५



Tuesday, 15 December 2020

Simple English Questions


(1) What colour is the parrot ?

Ans -- green
---------------------------------
(2) What is colour of rose ?

Ans -- pink
---------------------------------
(3) What colour is the sky ?

Ans -- blue
---------------------------------------------------------------
(4) What is the colour of ripe banana ?

Ans -- yellow
---------------------------------------------------------------
(5) What is the living place of a horse
called ?

Ans -- stable
---------------------------------------------------------------
(6) What is the female of a bull called ?

Ans -- cow
---------------------------------------------------------------
(7) What sound does a cuckoo make ?

Ans -- coo
---------------------------------------------------------------
(8) The young one of goat is called....... .

Ans -- Kid
---------------------------------------------------------------
(9) Where does a bull live ?

Ans -- shed
---------------------------------------------------------------
(10) The female of a dog is called ....... .

Ans -- bitch
---------------------------------------------------------------
(11) The young one of a dog is called ..... .

Ans -- puppy
---------------------------------------------------------------
(12) What is the young one of a cow called ?

Ans -- calf .
================================
SHANKAR SITARAM CHAURE
Z. P. SCHOOL - JAMNEPADA
TAL. SAKRI, DIST. DHULE
9422736775

Monday, 14 December 2020

विषय - मराठी (भाषा) उतारा वाचा व लिहा.

 
(१) गायी गोठ्यात बांधतात.
पक्षी घरट्यात राहतात.
उंदीर बिळात राहतो.
वाघ गुहेत राहतो.
कोंबड्यांसाठी खुराडे असते.
----------------------------------
(२) सूर्य सकाळी उगवतो.
सूर्याचा प्रकाश पडतो.
दुपारी ऊन कडक असते.
सूर्य संध्याकाळी मावळतो.
रात्री अंधार पडतो.
--------------------------------------------------
(३) वारा वाहतो.
आकाशात ढग येतात.
मुसळधार पाऊस पडतो.
सगळीकडे पाणीच पाणी होते.
सर्वांना आनंद होतो.
-------------------------------------------------
(४) ऊस गोड असतो.
मिरची तिखट असते.
चिंच आंबट असते.
कारले कडू असते.
आवळा तुरट असतो.
-----------------------------------------------
(५) ज्वारीची भाकरी करतात.
गव्हाची चपाती करतात.
तांदळाचा भात करतात.
डाळीची आमटी करतात.
साबुदाण्याची खिचडी करतात.
-----------------------------------------------
(६) कच्चा आंबा म्हणजे कैरी.
कैरी आंबट असते.
कैरीचे लोणचे करतात.
कैरी पिकली की पिवळी होते.
पिकलेल्या आंब्याचा रस करतात.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 13 December 2020

महाराष्ट्र -- भौगोलिक सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड

(२) कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा

(३) राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर

(४) जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद

(५) भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अहमदनगर

(६) तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर

(७) खडकवासला धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे

(८) बिंदूसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- बीड

(९) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड

(१०) मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अमरावती

(११) येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- हिंगोली

(१२) उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सोलापूर

(१३) पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे

(१४) तुलतुली धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- गडचिरोली

(१५) नळगंगा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- बुलढाणा

(१६) पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नागपूर

(१७) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- गोदिंया

(१८) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- मुंबई शहर

(१९) धोम धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा

(२०) अनेर डॅम (धरण) कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५

Saturday, 12 December 2020

स्पर्धा परीक्षा प्रश्नावली


(१) महाराष्ट्र पोलिस दलाचे बीद्र वाक्य कोणते ?
उत्तर -- सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

(२) वंदे मातरम् गीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी

(३) ' जय जवान जय किसान ' हे उद्गार कुणाचे होते ?
उत्तर -- लाल बहादूर शास्त्री

(४) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठे राज्य कोणते ?
उत्तर -- राजस्थान

(५) महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वोच्च पद कोणते ?
उत्तर -- पोलिस महासंचालक
================================
( ६) एका चौरसाच्या बाजूची लांबी ८ से. मी. आहे. तर
त्याची परिमिती किती ?
उत्तर -- ३२ से. मी.

(७) जर ५ मुले ५ पाने ५ मिनिटात लिहितात, तर १
मुलगा १ पान किती मिनिटात लिहिल ?
उत्तर -- १ मिनिट

(८) ४ माणसे एक काम ८ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ८ माणसे किती दिवसांत करतील ?
उत्तर -- ४ दिवस

(९) दोन संख्यांचा गुणाकार १२० आहे. त्यापैकी एक संख्या १२ असल्यास दुसरी संख्या कोणती ?
उत्तर -- १०

(१०) एक दोरी ६ ठिकाणी कापली असता, तिचे किती तुकडे होतील ?
उत्तर -- ७ तुकडे
=================================
(११) विद्युत प्रवाहाचे एकक कोणते ?
उत्तर -- अॅम्पियर

(१२) डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे ?
उत्तर -- आवाजाची तीव्रता

(१३) मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड ( फिमीर )

(१४) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार

(१५) प्लेग हा आजार कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ?
उत्तर -- उंदीर
=================================
(१६) नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
उत्तर -- गोदावरी

(१७) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग

(१८) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार

(१९) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपुर

(२०) माउंटअबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- राजस्थान
================================
(२१) ' पाणी ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- जल

(२२) मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
उत्तर -- दर्पण

(२३) कविता राऊत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू ( अॅथेलेटिक्स )

(२४) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?
उत्तर -- देवनागरी

(२५) ' केसाने गळा कापणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ
सांगा ?
उत्तर -- विश्वासघात करणे
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Friday, 11 December 2020

समानार्थी शब्द / विरूध्दार्थी शब्द प्रश्नावली


(१) ' वृक्ष ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- झाड

(२) ' कच्चा ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- पक्का

(३) ' माय ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- आई

(४) ' दिवस ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- रात्र

(५) ' बंधू ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- भाऊ

(६) ' निर्जीव ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- सजीव

(७) ' नेत्र ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- डोळा

(८) ' धीट ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- भित्रा

(९) ' मोर ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- मयूर

(१०) ' पारतंत्र्य ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- स्वातंत्र्य

(११) ' मूषक ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- उंदीर

(१२) 'ओले ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- सुके

(१३) ' मेघ ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- ढग

(१४) ' बेरीज ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- वजाबाकी

(१५) ' मानव ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- मनुष्य

(१६) ' गरीब ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा ?
उत्तर -- श्रीमंत
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday, 10 December 2020

भौगोलिक सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- प्रवरा

(२) 'माथेरान ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड

(३) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- गोदावरी

(४) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे

(५) पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किना-यावर वसलेले आहे ?
उत्तर -- भीमा

(६) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद

(७) कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे ?
उत्तर -- अलिबाग

(८) धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर -- पांझरा

(९) बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- नंदुरबार

(१०) गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक

(११) देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद

(१२) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे 

Tuesday, 8 December 2020

समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द सांगा.


(१) मोळी कशाची ?
उत्तर -- लाकडांची

(२) तांडा कोणाचा ?
उत्तर -- उंटांचा

(३) गठ्ठा कशाचा ?
उत्तर -- पुस्तकांचा

(४) जाळी कशाची ?
उत्तर -- करवंदांची

(५) थवा कुणाचा ?
उत्तर -- पक्ष्यांचा

(६) घड कशाचा ?
उत्तर -- केळ्यांचा

(७) तुकडी कोणाची ?
उत्तर -- सैनिकांची

(८) संघ कोणाचा ?
उत्तर -- खेळाडूंचा

(९) राई कशाची ?
उत्तर -- आंब्याच्या झाडांची

(१०) जुडगा कशाचा ?
उत्तर -- किल्ल्यांचा

(११) झुपका कशाचा ?
उत्तर -- केसांचा

(१२) पेंढी कशाची ?
उत्तर -- गवताची

(१३) रास कशाची ?
उत्तर -- धान्याची

(१४) ढीग कशाचा ?
उत्तर -- नारळांचा

(१५) पुडके कशाचे ?
उत्तर -- नोटांचे

(१६) जुडी कशाची ?
उत्तर -- पालेभाजीची

(१७) थप्पी कशाची ?
उत्तर -- पोत्यांची

(१८) गुच्छ कशाचा ?
उत्तर -- फुलांचा

(१९) उतरंड कशाची ?
उत्तर -- मडक्यांची

(२०) कळप कोणाचा ?
उत्तर -- मेंढ्यांचा

(२१) टोळी कुणाची ?
उत्तर -- चोरांची

(२२) जमाव कोणाचा ?
उत्तर -- माणसांचा

(२३) संच कशाचा ?
उत्तर - प्रश्नपत्रिकांचा

(२४) घोळका कुणाचा ?
उत्तर -- मुलांचा

(२५) वृंद कशाचा ?
उत्तर -- वाद्यांचा
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 6 December 2020

सामान्य विज्ञान प्रश्नावली


(१) भूकंपमापक यंत्राला काय म्हणतात ?
उत्तर -- सिस्मोग्राफ

(२) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा

(३) वीज वाहून नेण्यासाठी कोणत्या धातूंच्या तारांचा वापर करतात ?
उत्तर -- तांबे , अॅल्युमिनिअम.

(४) कावीळ हा रोग मुख्यतत्वे कशामुळे होतो ?
उत्तर -- पाण्यामुळे

(५) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे विकार

(६) वनस्पतींना भावना असतात हा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जगदीशचंद्र बोस

(७) गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत कोणी मांडला ?
उत्तर -- न्यूटन

(८) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला ?
उत्तर -- तांबे

(९) तापमान मोजण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
उत्तर -- थर्मामीटर

(१०) पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सूर्यप्रकाश

(११) अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात ?
उत्तर -- कार्बन डाॅयआॅक्साइड

(१२) विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

Saturday, 5 December 2020

गणितीय सामान्यज्ञान प्रश्नावली

        
(१) १२३४ + ४३२१ = किती ?
उत्तर -- ५५५५

(२) ९८७६५ -- १२३४५ = किती ?
उत्तर -- ८६४२०

(३) २०० × १०० = किती ?
उत्तर -- २०,०००

(४) ८६४२८ ÷ २ = किती ?
उत्तर -- ४३२१४

(५) ७ आठवडे = किती दिवस ?
उत्तर - ४९ दिवस

(६) ३ मीटर ५ सेमी = किती सेमी ?
उत्तर -- ३०५ सेमी

(७) १२ तास = किती मिनिटे ?
उत्तर -- ७२० मिनिटे

(८) ' २५ ' ही संख्या रोमन संख्या चिन्हांत कशी लिहिल ?
उत्तर -- XXV

(९) ६६००६ ही संख्या अक्षरांत लिहा ?
उत्तर -- सहासष्ट हजार सहा

(१०) ' सात हजार पाचशे पंचाहत्तर ' ही संख्या अंकांत लिहा ?
उत्तर -- ७५७५

(११) २० एकक = किती दशक ?
उत्तर -- २ दशक

(१२) १ शतक = किती एकक ?
उत्तर -- १०० एकक

(१३) ५ शतक + ५ शतक = किती हजार. ?
उत्तर -- १ हजार ( एक हजार )

(१४) पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- १०, ०००

(१५) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- ९९, ९९९

(१६) २३१२ + ३२२१ + १००२ = किती ?
उत्तर -- ६५३५

(१७) २००० × १ = किती ?
उत्तर -- २०००

(१८) पावणे दहा वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे .
उत्तर -- ९ वाजून ४५ मिनिटे

(१९) १ वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर -- १२ महिने

(२०) ८००० + ८०० + ८० + ८ = ?
उत्तर -- ८८८८
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५




Friday, 4 December 2020

म्हणजे काय ? (अनेक शब्दांबद्दल एक शब्द )


(१) चंद्रापासून येणारा प्रकाश.

--- चांदणे

(२) लग्नात द्यावयाची भेट.
--- आहेर

(३) गुप्त बातम्या काढणारा.
--- गुप्तहेर

(४) नाणी तयार करण्याचा कारखाना.
--- टंगसाळ

(५) सापाचा खेळ करणारा.
--- गारूडी

(६) फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरूंद वाट.
--- पाऊलवाट

(७) तीन रस्ते एकवटतात ती जागा.
--- तिठा

(८) अस्वलाचा खेळ करणारा.
--- दरवेशी

(९) पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ.
--- पेय

(१०) दगडावर कोरलेला लेख.
--- शिलालेख

(११) नव-या मुलाची आई.
--- वरमाय

(१२) चांदणे असलेला पंधरवडा.
--- शुक्लपक्ष

(१३) अंधा-या रात्रीचा पंधरवडा.
--- कृष्णपक्ष

(१४) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख.
--- ताम्रपट

(१५) चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
--- बेट

(१६) माकडाचा खेळ करून दाखवणार.
--- मदारी

(१७) चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
--- चौक

(१८) कविता करणारा / रचणारा.
--- कवी

(१९) कविता करणारी.
--- कवयित्री

(२०) कुस्ती खेळण्याची जागा.
--- आखाडा
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday, 3 December 2020

सामान्य विज्ञान प्रश्नावली

     
(१) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सियस असते ?
उत्तर -- ३७ ° अंश सेल्सियस

(२) माणसाच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?
उत्तर -- ७२

(३) कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?
उत्तर -- ओ ( O )

(४) मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते ?
उत्तर -- २०६

(५) मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?
उत्तर -- २४

(६) मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते ?
उत्तर -- ३३

(७) पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास
इजा होते ?
उत्तर -- मज्जासंस्था

(८) प्लेग हा रोग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ?
उत्तर -- उंदीर

(९) सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे काय होते ?
उत्तर -- बाष्पीभवन

(१०) समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ?
उत्तर -- पाण्यातील भूकंप

(११) मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के रक्त शरीरात असते ?
उत्तर -- ९ %

(१२) शुध्द सोने किती कॅरेटचे असते ?
उत्तर -- २४ कॅरेट
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५


Tuesday, 1 December 2020

स्पर्धा परीक्षा सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) कुठल्या शहरात सुप्रिध्द ताजमहल आहे ?
उत्तर -- आग्रा

(२) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे .
उत्तर -- दिल्ली

(३) शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर -- नांदेड

(४) महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला ?
उत्तर -- साबरमती

(५) अंदमान - निकोबार बेटांचे राजधानीचे शहर कोणते आहे ?
उत्तर -- पोर्ट ब्लेअर

(६) संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- अमरावती

(७) बिहू हे नृत्य कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- आसाम

(८) महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते ?
उत्तर -- धसई ( ठाणे )

(९) राष्ट्रीय पोलिस अकादमी कोठे आहे ?
उत्तर -- हैद्राबाद

(१०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी 'मोझरी '
कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अमरावती

(११) जागतिक बॅंकेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर -- वाॅशिंग्टन

(१२) मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- परभणी
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५