एक होता भगवान बिरसा
आदिवासींचा महान वारसा
सुगाना वडिलांचं नाव
उलिहातू जन्म गाव
गरीबीशी झगडत होते
मीठभाकर खात होते
मिशनरी शाळेत शिक्षण पूर्ण केलं
त्याचवेळी आदिवासींचं दुःखही पाहिलं
तो काळ पारतंत्र्याचा होता
आदिवासींना अधिकार नाकारला होता
जुलमी सत्तेची चीड आली
अन्यायाला वाचा फोडून दिली
इंग्रजांविरूध्द उलगुलान पुकारला
त्याच्या पराक्रमाने इतिहास घडला
भारतीयांसाठी लढत राहिला
म्हणूनच देशाने स्वातंत्र्य पाहिला
स्वातंत्र्य लढ्यात रक्त सांडले
अखेरपर्यंत इंग्रजांशी भांडले
इंग्रज हरला, पारतंत्र्य सरला
बिरसा भारतीयांचा हिरो ठरला.
----------------------------------------------
कवी /लेखक - शंकर सिताराम चौरे
काकरपाडा (चौपाळे)ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment