माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 3 November 2021

भाषिक कोडे --- मी कोण ?



१. झाडावर राहतो, 
वसंतात गातो, 
काळा जरी मी 
आनंद पसरवतो. 
मी कोण ?

उत्तर :-- कोकीळ
------------------------------------
२. समुद्रकिनारी राहतो,
 उंच उंच वाढतो, 
शुभकार्यात माझ्या फळाला 
फारच मान मिळतो. 
मी कोण ?

उत्तर :-- नारळ
-------------------------------------
३. माझ्या पानांचे तोरण करतात, 
फुलांना 'मोहोर' म्हणतात,
 सुमधुर फळांची सर्वच 
वाहव्वा करतात.
मी कोण ?

उत्तर :-- आंब्याचे झाड
-------------------------------------
४. मातीत मी राहतो
अन् ती सुपीक बनवतो,
 शेतकरीदादा शाबासकी देतो.
मी कोण ?

उत्तर :-- गांडूळ
-----------------------------------
५. डोंगरावरून येते,
 सदैव धावते, 
शेते आणि माणसांना
उपयोगी पडते.
मी कोण ?

उत्तर :-- नदी
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक ‌)
 जि. प. प्रा.  जामनेपाडा, केंद्र - रोहोड
 ता. साक्री, जि. धुळे
 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment