माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 19 November 2021

म्हणजे काय ? ( शब्दाचे विस्तारित अर्थ )



(१) आजोळ
---- आईच्या वडलांचे गाव.

(२) दीर
----  पतीचा भाऊ.

(३) धनवान
---- ‌भरपूर संपत्ती असणारा.

(४) खट्याळ
---- नेहमी खोडी काढणारा.

(५) पाणबुडी
---- ‌पाण्याखालून चालणारी बोट.

(६) झावळ्या
----  नारळाच्या झाडाची पाने.

(७) वशिंड
---- ‌बैलाच्या मानेवरील उंचवटा.

(८) वाटाड्या
---- ‌वाट दाखविणारा.

(९) लेणी
----  डोंगरातील दगडात खोदलेले शिल्प.

(१०) शिल्प
----  दगडावर केलेले कोरीव काम.

(११) कलाप्रेमी
----  कलेची आवड असणारा.

(१२) चौक
----  चार रस्ते एकत्र येतात ती जागा.

(१३) दुर्ग
----  सागरातील किल्ला.

(१४) वेस
---- गावाचे प्रवेशद्वार.

(१५) लोकप्रिय
----  लोकांना आवडणारे.

(१६) मदारी
----  माकडांचा खेळ करणारा.

(१७) कथेकरी
---- कथा सांगणारा.

(१८) नावाडी
----  होडी चालवणारा.

(१९) वनचर
----  वनात राहणारे प्राणी.

(२०) चित्रकार
----  चित्र काढणारा‌.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
      जिल्हा परिषद शाळा - जामनेपाडा 
      केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
      ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment